Gauri Achari Murder Case | Gaurav Bidre Case Dainik Gomantak
गोवा

Gauri Achari Murder Case : त्या ‘मेसेज’मधून गौरवची गुन्हेगारी वृत्ती उघड

Gaurav Bidre Case : म्हणे ‘कागदोपत्री नोंदीत गुन्हेगार असलो तरी मनाने नाही’

दैनिक गोमन्तक

पणजी : गौरी आचारी खूनप्रकरणी अटक केलेल्या आणि सध्या कारागृहात असलेल्या संशयित गौरव बिद्रे याची गुन्हेगारी वृत्ती दर्शविणारा आणखी एक प्रकार पुढे आला आहे. त्याने गौरीच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवसापूर्वी मोबाईलवर एक संदेश पाठविला होता, त्यात ‘आपण कागदोपत्री गुन्हेगार असलो तरी मनाने नाही’, असे त्याने म्हटले आहे.

दैनिक ‘गोमन्तक’ला हा मोबाईल संदेश उपलब्ध झाला असून, त्यावरून गौरवने एकप्रकारे सोज्वळपणाचा आव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी गौरीचा खून करून त्याने कागदोपत्री नव्हे, तर खरोखरच मनानेही खुनी असल्याचे सिद्ध केले आहे.

गौरी आचारीचा जून महिन्याच्या 23 तारखेला खून झाला आणि राज्यात खळबळ उडाली होती. संशोधक वृत्तीची आणि उच्चशिक्षित गौरीचा मारहाण व गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह गौरवने कदंब पठारावर झाडीत फेकून दिला होता.

तत्पूर्वी गौरवची गौरीशी सलगी असल्यामुळे त्याने तिच्या वडिलांना त्यांच्या वाढदिवसापूर्वी एक संदेश पाठविला होता. त्यात त्याने आपण कागदोपत्री गुन्हेगार असलो तरी मनाने नाही, म्हटले आहे. त्यामुळे त्याने पाठविलेल्या त्या संदेशाच्या पहिल्या दोन ओळीतच आपली वृत्ती दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येते.

पोलिस दलावर चौफेर टीका

गौरवला जेव्हा पोलिसांनी कमांडोजना प्रशिक्षणासाठी नेमल्याचे प्रकरण बाहेर आले, तेव्हापासून पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. समाज माध्यमांवर पोलिसांच्या या कृत्याविषयीही प्रश्‍न उपस्थित होत आहेत. एखाद्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यापूर्वी त्याचा अनुभव, त्याची पार्श्‍वभूमीही तपासणे आवश्‍यक आहे.

कठोर शिक्षेसाठी नातेवाईकांची धडपड : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गौरवविरुद्ध पोलिसांकडून खरोखरच प्रबळ आरोपपत्र दाखल झाले पाहिजे, यासाठी गौरीचे नातेवाईक गौरवची विविध स्तरांतून माहिती गोळा करीत आहेत. गौरीच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

SCROLL FOR NEXT