Goa CM And Gaurav Bakshi Dainik Gomantak
गोवा

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

Goa Crime News: राज्यातील मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लँड माफियांना दिल्याचा आरोप बक्षीने केला होता. याप्रकरणी बक्शीविरोधात गुन्हा शाखेने गुन्हा नोंद केला होता.

Pramod Yadav

पणजी: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात बदनामीकारक व्हिडिओ बनविणाऱ्या अभिनेता गौरव बक्शीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. बक्शीविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात आला आहे. केलेल्या व्हिडिओबाबत बक्शीने कोर्टासमोर माफी मागितल्यानंतर गुन्हा रद्द करण्यात आला. दरम्यान, त्याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

गौरव बक्शीने गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात बदनामीकारक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. राज्यातील वनक्षेत्र कमी होण्यास मुख्यमंत्री व तत्कालिन वनमंत्री सावंत जबाबदार असल्याचा आरोप बक्शीने केला होता. राज्यातील मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लँड माफियांना दिल्याचा आरोप बक्शीने केला होता. याप्रकरणी बक्शीविरोधात गुन्हा शाखेने गुन्हा नोंद केला होता.

जुलै महिन्यात याप्रकरणी गुन्हा शाखेने गुन्हा नोंद केला होत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली असता, गौरव बक्शीने केलेल्या व्हिडिओबाबत कोर्टासमोर माफी मागितली.

तसेच, व्हिडिओ तथ्यावर आधारीत नसल्याचे सांगितले. बक्शीची माफी विचारात घेऊन कोर्टाने गुन्हा रद्द केला पण, त्याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम गोवा फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेला देण्यात यावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

गौरव बक्शीने वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावरुन हटवल्याचे देखील कोर्टासमोर सांगितले आहे. बक्शीने मुख्यमंत्री प्रमोद सावंतच नव्हे तर यापूर्वी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्याशी देखील पंगा घेतला होता. गाडीवरुन मंत्री हळर्णकरांशी घातलेल्या हुज्जतीवरुन बक्शीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या व्हिडिओवरुन बक्शी वादात सापडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT