फोंडा: मुस्लीमवाडा - भोम येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील चीजवस्तू जळून खाक झाल्या. ही दुर्घटना आज रात्री आठच्या सुमारास घडली. रवी बोते यांच्या घरात गोविंद श्रीवास्तव आणि त्यांची पत्नी हे दोघे भाडेकरू म्हणून राहात होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून श्रीवास्तव दाम्पत्य बचावले.
ही दुर्घटना इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घडली. सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकल्यामुळे जवळचे लोक मदतीसाठी धावून आले. सरपंच अब्दुल खान तसेच इतरांनी यावेळी मदतकार्यात भाग घेतला.
अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत सुमारे दहा लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटामुळे घराच्या छपरावरील पत्रे उडून गेले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली.
दागिने, रोकड, कपडे जळून खाक
आगीत कपाटात ठेवलेले काही सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे दहा लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.