Online Payment Dainik Gomantak
गोवा

Online Payment: ऐन गणेश चतुर्थीत गॅससाठी 'रोखी'ची सक्ती; Google Pay बंद, ऑनलाइन पेमेंट करता न आल्याने ग्राहकांची मोठी परवड

Bicholim Gas Agency Online Payment Stopped: तालुक्यातील एका गॅस वितरक एजन्सीच्या गोदामात ऑनलाईन पेमेंटची सुविधा, विशेषतः ‘गुगल पे’ची सोय बंद करण्यात आली असल्याची माहिती ग्राहकांकडून मिळाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: तालुक्यातील एका गॅस वितरक एजन्सीच्या गोदामात ऑनलाईन पेमेंटची सुविधा, विशेषतः ‘गुगल पे’ची सोय बंद करण्यात आली असल्याची माहिती ग्राहकांकडून मिळाली आहे. ऐन चतुर्थीत ही सुविधा बंद करण्यात आल्याने कारापूर-सर्वणसह अन्य भागांतील ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना रोख रक्कम देेणे सक्तीचे केल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. आजच्या डिजिटल युगात बहुतांश व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत असताना या गॅस एजन्सीच्या गोदामात केवळ रोख रक्कम स्वीकारण्याची पद्धत ग्राहकांच्या दृष्टीने कालबाह्य ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विशेषत: अचानक सिलिंडर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडे रोख रक्कम उपलब्ध नसल्यास त्यांना ऑनलाईन पेमेंट करता येत नसल्याने सिलिंडर न घेताच रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजिटल आणि कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात रूढ झाला असतानाच अचानक गॅससारख्या अत्यावश्यक सेवेसाठी ग्राहकांना केवळ रोख रक्कम देण्याची अट घालणे, हा डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या प्रवाहाशी विसंगत प्रकार असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

गणेश चतुर्थीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात गॅस सिलिंडरची मागणी वाढलेली असताना ग्राहकांना अशा जाचक सक्तीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवेशी संबंधित व्यवहारात ग्राहकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घेणे गरजेचे असल्याचेही ग्राहकवर्गाचे मत आहे.

ऑनलाईन पेमेंटसाठी अडचण काय?

संबंधित एजन्सीकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात नेमकी अडचण काय आहे, असा सवालही ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित गॅस कंपनी तसेच पुरवठा यंत्रणेने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन गोदामात ऑनलाईन पेमेंटची सुविधा पूर्ववत करून ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी कारापूर, सर्वण आदी भागातील ग्राहकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT