Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Kashti Kale Drain Pollution: सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन योग्य तोडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
Kashti Kale Drain Pollution
Goa Drain PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: कष्टी काले येथे गणेश विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यात डुक्करपालन व्यवसायाचे सांडपाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थांवर गणेशमूर्तींचे विसर्जन चक्क पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये करण्याची वेळ आली. नाल्याचे प्रदूषण रोखून संबंधित डुक्करपालन व्यवसायावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन योग्य तोडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.माहितीनुसार, कष्टी गावात बाहेरील गावातील एका व्यक्तीकडून डुक्करपालनाचा व्यवसाय केला जात आहे. या व्यवसायातून निर्माण होणारे सांडपाणी आणि घाण गावातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Kashti Kale Drain Pollution
Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

त्यामुळे नाल्यातील पाणी प्रदूषित झाले असून, परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, नैसर्गिक नाल्यात सांडपाणी सोडण्याचा प्रकार तातडीने थांबवून संबंधित व्यवसायाची प्रशासनामार्फत पाहणी करावी. तसेच, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या प्रकाराविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आवाज उठविला आहे. संबंधित डुक्करपालन व्यवसायामुळे नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होत असल्याने हा व्यवसाय बंद करण्यात यावा अथवा सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.

Kashti Kale Drain Pollution
Goa POP Ganesh Idols: 'पीओपी'च्या गणेशमूर्तींवर कारवाई; 5 विक्रेत्यांना दंड, पण मूर्ती जप्तीचा पत्ता नाही! सरकारच्या कारवाईवर सवाल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Political Meetings During Ganesh Chaturthi
Morgaon Mayureshwar Temple History
Goa Ganesh Immersion Safety 2026
Ganesh Chaturthi Spiritual Significance Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com