Garbage Problem in Madgaon Dainik Gomantak
गोवा

मडगावात कचरा समस्या जटील

‘सोनसोडो’चा रस्ता खराब; ट्रकांना अडथळा; शहरात कचऱ्याचे ढीग

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव परिसरात कचऱ्याची समस्या जटील बनली असून सोनसोडो कचरा यार्डवरील रस्ता पावसामुळे खराब झाल्याने कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकांना नियोजित ठिकाणी कचरा नेण्यात अडथळा येत आहे . त्यामुळे मडगाव शहरातील कचरा उचल करण्याच्या दैनंदिन कामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात कचरा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Garbage problem increased in Madgaon )

या प्रकरणाची दखल घेऊन मडगाव पालिका मुख्याधिकारी रोहित कदम यांनी या सोनसोडो यार्डावर पाहणी करून तात्पुरता कच्चा रस्ता बांधण्यासाठी पावले उचलली आहेत .सोनसोडो कचरा यार्डवर पालिकेच्या कचरावाहू ट्रकांना ये जा करण्यासाठी एकमेव रस्त्याचा वापर करावा लागत असून या रस्त्यालगतच कचरा टाकण्यात

आला आहे. पावसाळ्यात हा कचरा तसेच माती, लोखंडी खिळे रस्त्यावर वाहून येत असतात, त्यामुळे कचऱ्याच्या वाहनांना नियोजित ठिकाणी कचरा नेण्यात अडचण निर्माण होत आहे. तसेच ट्रकांमधील कचरा खाली करण्यासाठी ताटकळत उभे रहावे लागत आहे. यातील काही ट्रकांना दिवसाच्या दोन फेऱ्या माराव्या लागत असून एकवेळचा ट्रक खाली करण्यास या ठिकाणी उशीर होत आहे.

त्यामुळे दुसऱ्या फेरीतील कचरा उचल करायला मिळत नाही. त्यामुळे मडगावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग तसेच एक दोन दिवस पडून राहत आहेत. दरदिवशी त्यात भर पडत आहे. हा कचरा पावसाळ्यात असाच पडून राहिल्यास या ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती रहिवाशांतून व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT