आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आयुष शिरोडकरचे पहिले मोठे यश

विशाखापट्टणम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या क गटात (1600 एलो गुणांखालील) त्याने अपराजित कामगिरीसह विजेतेपद पटकाविले.
Goa Sports News
Goa Sports NewsDainik Gomantak

पणजी : गोव्याचा प्रतिभाशाली युवा बुद्धिबळपटू आयुष शिरोडकर याने कारकिर्दीतील पहिले मोठे आंतरराष्ट्रीय यश साकारले. विशाखापट्टणम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या क गटात (1600 एलो गुणांखालील) त्याने अपराजित कामगिरीसह विजेतेपद पटकाविले.

Goa Sports News
मिरामार बीचवर देशी पर्यटकांची वर्दळ!

ग्रँडमास्टर गटातील मुख्य स्पर्धेसह इतर गटातही स्पर्धा झाली. सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेच्या आयुषने 10 फेऱ्यांत नऊ गुणांची कमाई केली. त्याने आठ विजय नोंदविले, तर दोन डाव बरोबरीत राखले. शेवटच्या फेरीत तमिळनाडूच्या व्ही. राघव याच्याविरुद्ध बरोबरीचा अर्धा गुण मिळवत आयुषने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

त्यामुळे आयुषचे विजेतेपद निश्चित झाले, तर साडेआठ गुणांसह राघवला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. श्रीलंकेच्या ज्युड डॉरिसन ज्ञानासीलान याला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. त्यापूर्वी नवव्या फेरीत आयुषने तेलंगणाच्या के. समरतेजा याला नमवून आघाडी भक्कम केली होती. सध्या 1528 एलो गुण असलेल्या आयुषला या स्पर्धेत चौथे मानांकन होते.

नावेली येथील रोझरी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या आयुषने अखिल भारतीय पातळीवर पहिली मोठी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला आहे. अव्वल कामगिरीमुळे त्याला करंडक व 50,000 रुपये बक्षिसादाखल मिळाले. स्पर्धेत जगभरातील एकूण 475 खेळाडूंचा सहभाग होता. ग्रँडमास्टर खुली, 2000 एलो गुणांखालील आणि 1600 एलो गुणांखालील अशा तीन गटात स्पर्धा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com