Sports Authourity of Goa land  Dainik Gomantak
गोवा

Sports Authourity of Goa: बेलाबाय-चिरकूनउडी येथे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या जागेत कचरा

सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sports Authourity of Goa: वास्को बेलाबाय - चिरकूनऊडी येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (साग) मालकीच्या जागेत कचरा टाकण्यात येत असल्यामुळे या परिसराला डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सागने याबाबत त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

येथे कचरा टाकण्याने मुरगावातील दुसरा कचरा प्रकल्प येथे तयार होत आहे. ही जागा वास्को टिळक मैदानावर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या वाहनांना पार्किंग व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात आली होती.

परंतु वास्को येथील गोवा शिपयार्ड कंपनीने सागच्या जागेत आपल्या आस्थापनात दोन मोठ्या इमारती व शिपयार्डचा विस्तार करण्यासाठी काढलेल्या फायलिंग मातीचा ढिगारा या जागेत टाकला आहे.

सध्या या जागेवर भंगार वाहनांसह खाजगी बसेस पार्क करून अतिक्रमण करण्यात आल्याचे दिसते. या संपूर्ण जागेत भंगार आणि कचरा टाकला गेला आहे.

येथे सध्या वास्कोसह दाबोळीतील कचरा टाकण्यात येत असल्याची माहिती आहे. येथील शेत जमीन बुजविण्यात आली आहे. यावर्षी गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. येथील मैदानावर सामने होतील तेव्हा पार्किंगसाठी या जागेचाच वापर केला जाईल.

त्यामुळे गोवा क्रीडा प्राधिकरणाने त्वरीत या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी. येथे दिवस रात्र सुरक्षा रक्षक नेमावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT