Garbage in Madgaon Dainik Gomantak
गोवा

मडगावात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कचऱ्याचं साम्राज्य

कचऱ्यात महत्त्वाची कागदपत्रही गहाळ होण्याची भीती

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव महानगरपालिकेच्या उद्यानासमोर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थलांतरण फातोर्डा येथील नव्या संकुलात करण्यात आले आहे. मात्र काही सरकारी कार्यालये अजूनही या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत सुरु आहेत. त्यांची कागदपत्रे या ठिकाणी अस्ताव्यस्त पडली असून त्यामुळे परिसरात कचऱ्याचं साम्राज्य असल्याचं दिसत आहे.

जुन्या जिल्हाधिकारी (Collector) कार्यालय परिसरात ई कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. अशा प्रकारे येथील सरकारी कार्यालयांची दैना झाली आहे. या इमारतीला चार मजले असून याठिकाणी एकंदरीत 6 सरकारी कार्यालये आहेत. यातील अनेक कार्यालयातील कचरा (Garbage) बाहेरच टाकण्यात येतो. त्यामुळेच परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.

यातील काही कागदपत्रे गहाळ झाल्यास आपली कामे घेऊन येत असलेल्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. अनेक कार्यालयातील कागदपत्रांचे डिजिटायझेशन अपूर्ण राहिलेले आहे. त्यामुळे एखादी फाईल गहाळ झाल्यास त्या व्यतीला ती प्रक्रियेसाठी पुन्हा सादर करावी लागणार आहे. यासोबतच नादुरुस्त असलेली विद्युत उपकरणे, जुने संगणक, त्यांचे सुटे भाग आणि इतर साहित्याचे ढीग परिसरात दिसत आहे. त्यामुळे मडगाव (Madgaon) येथील परिसराला बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT