Garbage Issue At Mulgao Dainik Gomantak
गोवा

Mulgao: मुळगावात कचऱ्याची समस्या जटिल; पंचायत हतबल

Garbage Issue At Mulgao: कचरा टाकण्याचे प्रकार बंद झाले नाही तर भयानक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोलीतील मुळगाव पंचायत क्षेत्रात पुन्हा एकदा कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले असून, कचराफेकुंच्या या कृतीमुळे पंचायतही पुरती हतबल झाली आहे. तांबडा रस्ता परिसरात लोकवस्तीजवळ तर कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून, तिथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. पावसामुळे हा कचरा कुजून भागात दुर्गंधी पसरली आहे.

साचलेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावली नाही, आणि कचरा टाकण्याचे प्रकार वेळीच बंद झाले नाही, तर परिसरात रोगराई आदी भयानक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तशी भीतीही लोक व्यक्त करीत आहेत. मुळगाव पंचायत क्षेत्रात कचऱ्याची समस्या कायम असून, काही केल्या कचरा गावची पाठ सोडत नाही.

एखाद्या जागेवर साचलेला कचरा उचलून पंचायतीने तो परिसर स्वच्छ केला, की कचराफेकू कचऱ्यासाठी नवीन जागा शोधून काढतात. सध्या तांबडा रस्ता परिसरात लोकवस्तीजवळ कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ही समस्या आहे. अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली.

वीज ट्रान्स्फॉर्मरजवळ कचऱ्याचा ढीग

तांबडा रस्ता परिसरातील ‘महेश गॅरेज’च्या मागच्या बाजूने लोकवस्तीजवळ सध्या कचऱ्याची समस्या भयानक बनली आहे. प्लास्टिकसह सुका आणि ओला कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याचे दिसून येत आहे. चिंतेची बाब म्हणजे रस्त्यालगतच्या वीज ट्रान्स्फॉर्मरला टेकूनच हा कचरा टाकण्यात आला आहे. हा कचरा कोण आणि कधी टाकतात. ते कळत नाही. मात्र हा कचरा रस्त्याने ये-जा करणारे टाकत असावेत. असा संशय काही स्थानिक व्यक्त करतात. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. पावसामुळे कचरा कुजला आहे, त्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. डासांची पैदास वाढून रोगराईची भीती नाकारता येत नाही,असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT