Sonsodo Catches Fire Again Dainik Gomantak
गोवा

Sonsodo Fire : सोनसोडो कचरा यार्डाला पुन्हा आग

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

दैनिक गोमन्तक

मडगाव : सोनसोडो कचरा यार्डाला आज दुपारी पुन्हा आग लागल्याने खळबळ उडाली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मागच्या मार्च महिन्यातही सोनसोडो कचरा यार्डाला अशीच भीषण आग लागली होती. (Sonsodo Catches Fire Again News Updates)

मडगाव येथील सोनसोडो कचरा यार्डातील कचऱ्याने आज दुपारी पुन्हा एकदा पेट घेतल्याने लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीतीने घर केले. या पूर्वी मागच्या मार्च महिन्यात येथील कचऱ्याने भर दुपारी असाच पेट घेतला होता त्याच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहिती नुसार ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. या कचरा यार्ड जवळ एक खासगी शाळा असून तिथे काही फेब्रिकेशनचे काम चालू असताना ठिणगी पडून पेट घेतला होता. ही आग अग्निशमन दलाने विझवली होती. पण नंतर हीच आग वर कचऱ्याच्या राशी पर्यंत पोहोचल्याने वरच्या कचऱ्यानेही पेट घेतला. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

मागच्या मार्च महिन्यात सोनसोडो येथे असलेल्या कचऱ्याच्या डोंगराला अशीच भीषण आग लागली होती त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा आठ तास अथक परिश्रम करून ही आग आटोक्यात आणली होती. त्यापूर्वी 2019 साली डिसेंबर महिन्यात या कचऱ्याला लागलेली आग सतत आठ दिवस धुमसत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT