Canacona Anganwadi Bad Condition Dainik Gomantak
गोवा

Canacona Anganwadi: गावडोंगरीतील अंगणवाडीची दुर्दशा! गळक्या छतामुळे विद्यार्थी भीतीच्या छायेत

प्लास्टर तुटून पडल्याचे आणि पेंट अधूनमधून खाली पडत असल्याचे निदर्शनास आले

Kavya Powar

Canacona Anganwadi Bad Condition: काणकोणमधील गावडोंगरी येथील अंगणवाडीला अत्यंत वाईट आले आहेत. अंगणवाडी खोलीतील छत गळत आहे. यामुळे सुमारे 20 मुले सतत भीतीच्या वातावरणात जगत आहेत. आतून बारकाईने पाहणी केल्यावर प्लास्टर तुटून पडल्याचे आणि पेंट अधूनमधून खाली पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अंगणवाडीतील मुलांच्या पालकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) ) आशांका गावकर यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. त्यांनी हे कबूल केले की अंगणवाडीच्या छताला खरंच गळती लागली आहे.

याबाबत पाहणी करण्यात आली असून संबंधित विभागाने अंदाजपत्रक तयार केल्यानंतर नूतनीकरणासाठी प्रशासकीय मान्यता व मंजुरी मागितली होती, असे त्या म्हणाल्या. पावसाळा ओसरला की दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. त्या पुढे म्हणाल्या की, काणकोण येथे आणखी दोन अंगणवाड्यांसाठीही मंजुरी मागितली आहे. त्यावरही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्ये सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT