Sanquelim Ganja Seizure: पोलिसांना टीप मिळाली, निळी पिशवी उघडल्यावर विस्फारले डोळे; साखळीत मोठी कारवाई, गांजाचा साठा जप्त

Goa Drugs Trafficing Case: गुन्हे शाखेने शुक्रवारी पहाटे साखळी येथे अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख रुपये किमतीचा ५.८ किलो गांजा जप्त केला आहे.
Ganja
GanjaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गुन्हे शाखेने शुक्रवारी पहाटे साखळी येथे अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख रुपये किमतीचा ५.८ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत उत्तर प्रदेशातील वीरेंद्र कुमार (२३) याला रंगेहात अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार मात्र पसार झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३.३५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत गुन्हे शाखेच्या पथकाने साखळीतील अप्पर हरवळे, केळबायवाडा परिसरातील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकला.

Ganja
Goa Drug Bust: कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; सिकेरीत 'इतक्या' लाखांच्या गांजासह पश्चिम बंगालचा तस्कर गजाआड

या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी तक्रार दाखल केली होती. छाप्यादरम्यान पोलिसांनी वीरेंद्र कुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या निळ्या रंगाच्या पिशवीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.

Ganja
Goa Drugs Case: तपासाची चक्रे फिरली अन् 'सुसान' जाळ्यात अडकली! वार्का ड्रग्ज प्रकरणाला 'आंतरराष्ट्रीय' वळण; अमेरिकन महिलेला गोव्यात बेड्या

तपासादरम्यान हा अमली पदार्थ विक्रीसाठी आणण्यात आला असून, त्याचा साथीदार विकास कुमार उर्फ रघुराज केसरी (उत्तर प्रदेश) याचा यात सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र विकास कुमार सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com