Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकरण क्राईम ब्रँचकडे, सरकारी वकिलांची माहिती

प्रक्रिया सुरू: परेशला जामिनासाठी करावी लागणार आणखी काही दिवस प्रतीक्षा
Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकरणाचा तपास म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे देण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या मर्सिडीज कारचालक संशयित श्रीपाद ऊर्फ परेश सिनाय सावर्डेकर याच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी दिली.

त्यामुळे ही सुनावणी आता येत्या सोमवारपर्यंत (२१ ऑगस्ट) तहकूब केली. त्यामुळे संशयित परेश याला जामिनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. फोंडा न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याने तो सध्या कोलवाळ कारागृहात आहे.

संशयित परेश सावर्डेकर याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्याने लगेच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या जामीन अर्जावर लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती त्यावेळी त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला केली होती.

मात्र, उच्च न्यायालयाने ही विनंती ऐकून न घेता ती आज १७ ऑगस्टला ठेवली होती. आज या सुनावणीवेळी सरकारी वकील प्रवीण फळदेसाई यांनी खंडपीठाला सांगितले, की म्हार्दोळ पोलिसांच्या तपासकामावर दिवाडीवासीयांनी अविश्‍वास दाखवल्याने हे प्रकरणी त्यांच्याकडून क्राईम ब्रँचकडे सोपविण्याबाबतची तयारी सरकारने दाखविली आहे.

त्यासंदर्भातची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ही सुनावणी तहकूब करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली. संशयित परेश सावर्डेकर यांच्या वकिलांनी त्याला आक्षेप घेतला नाही. त्यामुळे ही सुनावणी आता २१ रोजी होणार आहे.

बाणस्तारी अपघातप्रकरणी दिवाडीच्या नागरिकांसह आमदार राजेश फळदेसाई यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती व हा तपास क्राईम ब्रँचकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती.

अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी परेश तेथून पसार झाला होता. त्याच्याविरुद्धचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याची ओळखपरेड करायची आहे. राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याने तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो.

त्याच्याविरुद्ध वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची गोव्यात ६, तर कर्नाटकात १ अशी ७ चलन्स जारी केली व त्याचा दंड जमा केलेला नाही अशी माहिती पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली आहे.

Banastarim Bridge Accident
Goa Liquor Seized: 'पुष्पा' स्टाईलने गोवा बनावटीच्या दारूची तस्करी! पोलीसही निघाले वरचढ; कर्नाटकात जप्त केले 27 लाखांचे मद्य

जामिनाला विरोध

म्हार्दोळ पोलिसांनी संशयित परेश म्हार्दोळकर याच्या जामिनाला जोरदार विरोध केला आहे. संशयिताने मद्यप्राशन केले होते व त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असूनही त्याने कार चालविली व त्याच्या या निष्काळजीपणामुळे तिघांचा जीव गेला. त्याची अल्कोमीटरने मद्य चाचणी करण्यात आली, त्यामध्ये तीनपट मद्याचे प्रमाण सापडले होते.

Banastarim Bridge Accident
Mapusa Idol Desecration Case नंतर पोलिस यंत्रणा अलर्टमोडवर; अधीक्षक म्हणाले, 'आता धार्मिकस्थळांवर रात्रंदिवस..'

मेघनाचे पोलिस समन्सला आव्हान

परेश सावर्डेकर याची पत्नी तथा मर्सिडिज कारची मालकीण मेघना हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर फोंडा न्यायालयाने २३ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली असली तरी तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात म्हार्दोळ पोलिसांनी तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी पाठविलेल्या समन्सला आव्हान दिले आहे.

हे समन्स रद्द करण्याची विनंती तिने केली आहे. हा अर्ज तिने गेल्या आठवड्यात सादर केला असला, तरी त्यावरील सुनावणीची तारीख निश्‍चित करण्यात आली नव्हती. हा अर्ज सुनावणीसाठी पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तिला तीनवेळा समन्स पाठवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com