Mapusa Narcotic Raid Dainik Gomantak
गोवा

Mapusa Narcotic Raid: ग्राहकाला गांजा देण्यासाठी आला अन् जाळ्यात अडकला! म्हापसा पोलिसांची कारवाई

संशयिताकडून पोलिसांनी 50 हजार किंमतीचा 500 ग्रॅम गांजा जप्त केला

Kavya Powar

Mapusa Narcotic Raid: ग्राहकाला अमली पदार्थ पुरविण्यासाठी आलेल्या संशयित गोविंद जाधव (26, रा. म्हापसा) याला म्हापसा पोलिसांनी सापळा रचून आज (रविवारी) अटक केली. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये स्थानिकांचाही सहभाग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. यानंतर गुप्तहेरांच्या मदतीने पोलीस अशा प्रकरणात गुंतलेल्यांवर लक्ष ठेऊन असतात.

आज संशयित ग्राहकाला अमली पदार्थ पुरविण्यासाठी येणार असल्याची माहिती म्हापसा पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी म्हापशातील जेरोम चर्चच्या पार्किंग एरियामध्ये संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताकडून पोलिसांनी 50 हजार किंमतीचा 500 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

म्हापसा पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुमार मुखिया यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, पोलीस उपनिरीक्षक विराज कोरगावकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल अक्षय पाटील, आनंद राठोड यांनी ही कारवाई केली. यांच्यासमवेत अनंत कळंगुटकर यांनी चर्चच्या पार्किंगमध्ये छापा टाकला

दरम्यान पोलीस पुढील चौकशी करत असून आरोपीचा इतर कोणत्या घटनांमध्ये सहभाग आहे का, याची तपासणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT