Gangwar in Colvale Jail  Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: गँग्स ऑफ 'कोलवाळ'! कारागृहात दोन गटात राडा; अतिरिक्त पोलीस फोर्स तुरुंगात दाखल

पोलिसांनी संबंधित प्रकरणात धाव घेत विषय तिथेच मिटवला.

Kavya Powar

Gangwar in Colvale Jail : राज्यातील कोलवाळ कारागृह नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत असते. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, जेलमधील दोन गटांमध्ये टोळीयुद्ध झाले असल्याची घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा तुरुंग प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

जेलमध्ये गॅंगवॉर...

माहितीनुसार, कोलवाळ कारागृहात टारझन आणि कार्बोटकर अशा दोन टोळ्या सक्रिय आहेत. यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच वैर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, टारझन या टोळीला न्यायालयात सादर व्हायचे होते.

न्यायालयातून कारागृहात परत आल्यानंतर ते वैद्यकीय चाचणी करण्यासाठी गेले असता कार्बोटकर टोळीतील कैद्यांनी टारझन टोळीवर हल्ला चढवला. यानंतर टारझन टोळीतील कैद्यांनी तिथून पळ काढला आणि डिस्पेंसरी गाठली. यावेळी तिथे असलेल्या डॉक्टरांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि तुरुंग अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

यानंतर लगेचच तुरुंग अधिकारी तसेच कोलवाळ आणि म्हापसा पोलीस स्थानकातून अतिरिक्त अधिकारी कारागृहात दाखल झाले. पोलिसांनी संबंधित प्रकरणात धाव घेत विषय तिथेच मिटवला.

दरम्यान,  याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार देत विषय तितका गंभीर नसल्याचे सांगितले. मात्र कारागृहात वारंवार घडणाऱ्या घटनांवरून कैदी प्रशासन आणि पोलिसांना जुमानत नसल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT