Kaavi Art  Dainik Gomantak
गोवा

Kaavi Art : गोमंतकीय जोपासताहेत कावी कला

आधुनिकतेची जोड : युवा कलाकार सागर नाईक मुळे यांचा पुढाकार

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : पुरातन काळापासून माणूस आपल्या भावना चित्र, संगीताच्‍या माध्यमातून व्यक्त करत आला आहे. अशीच एक पुरातन चित्रकला म्हणजे कावी कला होय. गोव्याच्या लालमातीतून जन्मलेली कावी म्हणजे जणू मानवी सर्जनशीलतेचा आविष्कारच. पण ती सध्‍या मरणासन्न अवस्थेला येऊन ठेपलीय.

या कावी कलेला पुनर्जीवित करण्याचे तसेच तिला राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून देण्याचा प्रयत्‍न‍ गोमंतकीय युवा कलाकार सागर नाईक मुळे यांनी केला आहे. कावी कलेला आधुनिकतेची जोड देत त्‍यांनी कावी कला साकारली. त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील प्राप्त झाले आहे.

कावी कला ही कोकण प्रातांतील विविध मंदिरांमध्‍ये आजही पाहायला मिळते. वैशिष्टपूर्ण माती, चुना, विशिष्ट रंगाची पाने-फुले आणि अन्य घटक एकत्र करून हे मिश्रण व्यवस्थित कुजवून, तयार झालेल्या तांबड्या रंगाच्या कावीचा वापर वास्तूंचे रंगकाम करण्यासाठी केला जात असे. पंरतु काळचा ओघात ही कावी कला मागे पडत गेली.

कोरोना काळात सर्वत्र निराशा, अंधार पसरला असताना नवरात्रीच्या दिवसांत नऊ दिवस विविध देवींची चित्रे कावी कलेतून साकारून ती समाजमाध्यमांवर सागर यांनी टाकली असता त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या कलेचे कौतुक झाले आणि एका अर्थाने कावी कलेचे पुनर्जीवन प्राप्त झाले. ही घटना जशी सागर यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी होती, तशीच ती कावी कलेलाही कलाटणी देणारी ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा

सागर नाईक मुळे यांनी कावी कला जोपासून तिला नवसंजीवनी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रशंसा केली. प्राचीन कलांचे जतन करण्यासाठी देशवासीयांनी छोटे छोटे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे 100 कार्यक्रम पूर्ण झाल्याबद्दल आयोजित विशेष कार्यक्रमात सागर नाईक मुळे यांना दिल्ली येथे निमंत्रित देखील करण्यात आले होते.

कावी ही पुरातन कला आहे. ही कला आम्ही जपली पाहिजे. ती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. त्‍यासाठी मी प्रशिक्षण देत आहे. मोरजी, कुडचडे, म्युझियम ऑफ ख्रिश्‍चन आर्ट व इतर काही संघटनांद्वारे आयोजित कार्यक्रमांमध्‍ये अनेकांना मी कावी कलेचे प्रशिक्षण दिले आहे. अनेक गोमंतकीय ही कला शिकू पाहत आहेत, जोपासू पाहात आहेत, याचे मला समाधान वाटतेय.

- सागर नाईक मुळे, गोमंतकीय युवा कलाकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Merces: ..मध्यरात्री मडगावकडे जाणारी बस पेटली! मेरशी सर्कलजवळ घडली थरारक घटना; पर्यटकांची जीव वाचविण्यासाठी धडपड

Assagao Raid: आसगावात 7.30 लाखांचा गांजा जप्‍त; जम्मू काश्मीरच्या व्यक्तीला अटक; सात लाखांची रोकड जप्त

Rashi Bhavishya 04 August 2025: मान-सन्मान मिळू शकतो, वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; करिअरमध्ये सुधारणा

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

SCROLL FOR NEXT