Suspects In Fatorda Assault Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मनोरुग्ण मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

Fatorda Crime News: सामूहिक लैंगिक अत्याचार याप्रकरणी पोलिसांनी गेल्या आठवड्यात या पाच जणांना अटक केली होती.

Pramod Yadav

फातोर्डा: मनोरुग्ण मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना गेल्या आठवड्यात उघडकीस आली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयितांनी मुलीचे अपहरण करुन कासावली येथील फ्लॅटवर लैंगिक अत्याचार केले.

आदिल अलगर (१८), मोहम्मद अली मुल्ला (२२), शाहजाद शेख (१८), विरेश आग्वांदा (१८) व मोहम्मद शेख (१८) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहे.

मनोरुग्ण मुलीचे फातोर्डा येथून अपहरण करुन तिच्या कासावली येथील फ्लॅटवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी गेल्या आठवड्यात या पाच जणांना अटक केली होती.

पाचही संशयित परप्रांतीय असून, कामानिमित्त गोव्यात आले होते. पोलिसांनी गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याच रात्री चार जणांना ताब्यात घेतले व चौकशीअंती अटक केली. तर दुसऱ्या दिवशी यातील पाचव्या संशयिताला देखील अटक केली. दरम्यान, पाच जणांना पोलिस कोठडी सुनावली असल्याचे याप्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

Goa Tourism: पर्यटन हंगामास सुरुवात; विदेशी पर्यटकांची संख्या घटली, देशी पर्यटकांत वाढ

Goa Crime: 45 दिवसांत 10 अल्‍पवयीनांची अपहरणे, दक्षिण गोव्यात घर सोडून जाण्याचे प्रकार वाढले

Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

Goa Temple Festival: शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा कालोत्सव, 28 पासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

SCROLL FOR NEXT