Mapusa Court: नागेश गवळी खुनी हल्ला प्रकरण; पुराव्याअभावी संशयितांची निर्दोष सुटका

Goa Crime News: २०१८ साली मे महिन्यात ही घटना घडली होती. क्षितीज गिरीश गडेकर आणि नागेश गवळी यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरुन वाद झाला.
Mapusa Court: नागेश गवळी खुनी हल्ला प्रकरण; पुराव्याअभावी संशयितांची निर्दोष सुटका
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: नागेश गवळी खुनी हल्ला प्रकरणातील सर्व संशयितांची पुराव्याअभावी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. कैलासनगर, अस्नोडा येथे २०१८ साली ही घटना घडली होती. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती.

क्षितीज गिरीश गडेकर (डिचोली), साजद निजामुद्दीन करोल (डिचोली), निकेश पांडुरंग कवळेकर (पिळगाव) दिवंगत सिद्धार्थ संतोष परवार (पिळगाव) आणि अपूर्वा सोनू होबळे (डिचोली) यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

Mapusa Court: नागेश गवळी खुनी हल्ला प्रकरण; पुराव्याअभावी संशयितांची निर्दोष सुटका
Beach Shack Regulations: शॅकमधील संगीताने लोकांना त्रास नको, खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन द्या; पर्यटन खात्याचे परिपत्रक जारी

२०१८ साली मे महिन्यात ही घटना घडली होती. क्षितीज गिरीश गडेकर आणि नागेश गवळी यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरुन वाद झाला. दरम्यान, संतापलेल्या क्षितीज या संशयिताने नागेशचा शोध घेत त्याचे घर गाठले. नागेशला संशयिताने गराडा घातला आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली.

Mapusa Court: नागेश गवळी खुनी हल्ला प्रकरण; पुराव्याअभावी संशयितांची निर्दोष सुटका
Green Goa: गोव्याचा हरित राज्य कृती आराखडा तयार, सरकारी खाती करणार अंमलबजावणी; 15 वर्षांचा Master Plan

याप्रकरणी गवळी यांनी म्हापसा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करुन संशयितांना अटक केली. पोलिसांनी म्हापसा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र, खटल्यावेळी संशयितांविरोधात पुरावे सादर करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे संशयितांची निर्दोष सुटका करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com