Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव मंडळे लागली कामाला! घरोघरीही सजावटीच्‍या कामाला वेग

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: गोमंतकीयांचा सर्वांत मोठा गणेश चतुर्थी उत्‍सव अवघ्‍या पाच दिवसांवर येऊन ठेपल्‍याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ‘चवथी’च्या तयारीला आता खऱ्या अर्थाने गती येऊ लागली आहे. घरोघरी गणेशभक्त तयारीला लागले असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही सजावटीच्या कामाला वेग दिला आहे.

डिचोलीसह साखळी, विठ्ठलापूर-कारापूर, वेळगे, हातुर्ली-मये, साळ, कुडचिरे आदी भागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. शिवाय डिचोली पोलिस ठाण्यातही गणपतीपूजन करण्यात येते.

डिचोलीतील विविध गणेशोत्सव मंडळे सध्या मंडप उभारणी, सजावट ते देखावे उभारणीच्या कामात मग्न असल्याचे आढळून येत आहे. कलाकार तसेच मंडळांचे कार्यकर्ते रात्री जागवू लागले असून, सजावटीची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. बाजारातही खरेदीसाठी हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. सजावटीचे साहित्‍य घेण्‍याबरोबरच नवीन कपडे खरेदीला प्राधान्‍य देण्‍यात येत आहे.

पताका, मखरे आकर्षण

चतुर्थी म्हटली की घरोघरी साफसफाई, रंगकाम करून पताका लावण्यापासून ते गणपतीसमोर सजावट करण्यात येते. साधारण नागपंचमीनंतर चतुर्थीची तयारी सुरू होते. काही ठिकाणी तर नवनवीन संकल्पना आणि विषय घेऊन पर्यावरणपूरक सजावट, देखावे उभारण्याची परंपरा आहे. सध्या सर्वत्र घरोघरी सजावटीची कामे सुरू आहेत. चतुर्थी जवळ आल्याने सजावटीची कामे करण्याची लगबग चालू आहे. बाजारात कागदी पताका, मखर आदी सजावट साहित्याच्या खरेदीलाही जोर आला आहे.

पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्‍य

ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक देखव्यांचा इतिहास असलेल्या डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाही ऐतिहासिक किल्ल्याचा देखावा उभारण्यात येत आहे. चित्रकार मिलिंद तेली यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य देखावा उभारण्यात येत आहे. डिचोली पोलिस स्थानकातही पर्यावरणपूरक सजावट आणि देखावा उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. गेल्यावर्षी पौराणिक देखावे आकर्षण ठरलेल्या विठ्ठलापूर-कारापूर आणि साखळी गणेशोत्सवसह अन्य मंडळांचेही सजावटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT