Ganesh Chaturthi Shopping  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2021: खरेदीची लगबग; बाजारात वाढली गर्दी

गावागावांतील चित्रशाळांही गजबजल्‍या; महागाईमुळे सर्वसामान्‍य गोवेकरांचा काटकसरीकडे कल

दैनिक गोमन्तक

पणजी: गोमंतकीयांचा (Goa) सर्वांत मोठा व आवडता गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण तोंडावर आला आहे. अवघे 11 दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे बाजारपेठा (Market) फुलू लागल्‍या असून, खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. गणपतीच्‍या चित्रशाळाही गजबजून गेल्‍या आहेत. एकंदरीत आतापासून उत्‍सवाचे वातावरण तयार होऊ लागले आहे.

गावागावांतील गणपती चित्रशाळांमधील गणेशमूर्तींचे रंगकाम पूर्ण होत आले असून कलाकार त्‍यावर अंतिम हात फिरवण्‍यात मग्न आहेत. दुसरीकडे सुट्टीचा दिवस किवा सवड पाहून लोक खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत. चतुर्थीसाठी हव्या असलेल्या वस्तूंची त्‍यामुळे मागणी वाढली आहे. गोवा बागायतदार, सहकार भांडार आदींबरोबरच सणासाठी लागणारे सामान, कपडे आदी खरेदीसाठी मॉल, दुकानांमध्‍ये गर्दी वाढू लागली आहे. या खरेदीमध्ये महिला आघाडीवर आहेत. मात्र सर्वच जीवनावश्‍यक वस्तूंचे दर बरेच वाढले असल्याने आधीच कोरोनामुळे होरपळलेल्या नागरिकांना आता महागाईच्या वणव्यात होरपळावे लागत आहे. खाद्यतेलाचे दर तर गगनाला भिडले असून तब्बल 190 ते 250 रुपये लिटर असा भाव आहे. मागील चतुर्थीपुर्वी हा दर 120 ते130 रुपये होता. मसाले, कडधान्ये, तांदूळ याबरोबरच शोभेच्या दारुकामाचे साहित्‍यही महागले आहे.

आता हळूहळू दुकाने खुली झालेली आहेत. पणजी येथील बाजारातही बरीच गर्दी वाढू लागली आहे. मात्र राज्यभरातील खरेदीचा आढावा घेतल्यास सर्वसामान्यांत खरेदीचा पूर्वीचा उत्साह दिसून येत नव्हता. महागाई आणि कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्यामुळे लोक वस्तूंचे दर विचारुन परवडणाऱ्या व गरजेच्याच वस्तू खरेदी करताना दिसत आहेत.

सुट्टीच्‍या दिवशी उडतेय झुंबड

दुकानदार व इतर व्यावसायिकही गेले दीड वर्ष व्यवसाय बंद असल्‍याने आर्थिक संकटात सापडले आहेत. फक्त सरकारी नोकरांना कोरोनाचा मोठा फटका बसलेला नाही. त्यामुळे त्यांची खरेदी तेजीत तर इतरांची काटकसरीने सुरु आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक नोकरी व मुलांच्या शिक्षणानिमित्ताने शहरात राहतात. यात बहुतांश सरकारी नोकरांचा समावेश आहे. हे नोकरदार गणेश चतुर्थीची खरेदी दहा-बारा दिवस अगोदर सुट्टीच्‍या दिवशी करतात. त्यानुसार काल शनिवारी व आज रविवारी खरेदीसाठी गर्दी दिसून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT