Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: सत्तरीत गणपती मूर्तींवर कलाकारांचा शेवटचा हात

Goa Ganesh Chaturthi 2023: विक्रीसाठी तयार : लोकांत चतुर्थीचा उत्साह

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: सत्तरी तालुक्यात ग्रामीण भागात गणपती मूर्तींवर कलाकारांकडून शेवटचा हात फिरविला जातो आहे. या मूर्ती आता विक्रीसाठी पूर्णपणे तयार आहेत. अत्यंत सोज्वळ, मनमोहक अशा गणपतीच्या मूर्ती आकर्षण ठरत आहेत. कलाकारांनी आपल्या घरातच मूर्ती बनवून तेथे उत्साही वातावरण तयार केले आहे.

सत्तरी तालुक्यात अनेकजण गणपतीच्या मूर्ती बनवतात. म्हाऊस गावातील रजत गावकर या युवकाने पणजोबांनी सुरू केलेली गणेश चित्रशाळा आजही जपली आहे. स्व. लाडू पांडू गावकर यांनी सुरवातीला लहान प्रमाणात मातीच्या गणपती मूर्ती तयार करण्यास सुरवात केली होती. तसेच बारकेलो पांडू गावकर यांनी कला अंगीकारली व आता बारकेलो गावकर यांचा सुपुत्र रजत गावकर गणपती करीत आहेत. त्यामुळे पणजोबा, काका, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ही गणेशसेवा कलेच्या माध्यमातून रजत गावकर करीत आहे.

गणेश चित्रशाळेला 180 वर्षांचा इतिहास

या गणेश चित्रशाळेला सुमारे 180 वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. म्हाऊस, दाबे, झर्मे, केरी, पर्ये, सावर्डे, वेळगे, रावण, वेळगे, गोमळ, वेळूस, ब्रह्माकरमळी, नानेली, नगरगाव, धावे, कुडशे, घोटेली केरी, मोर्ले, साखळी, डिचोली या गावांत गणपती मूर्तींना मागणी आहे. वाळपई येथे वेलिंगकर गणेश चित्रशाळेत मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे.

युवकांचा पुढाकार

दाबोस, धावे, उस्ते, नगरगाव, बांबर, कुडशे, दाबोस आदी ठिकाणी गणेश चित्रशाळेत गणेशमूर्ती तयार झालेल्या आहेत. एकूणच सत्तरीत पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली मूर्तीकला जोपासण्यात युवा पिढीचा मोठा वाटा आहे. युवकांचे कलाकौशल्य वाखाणण्याजोगे म्हणावे लागेल. सत्तरीत चतुर्थीच्या सणाने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण बनलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT