Goa Ganesh Chaturthi 2023: वाळपईत चतुर्थी बाजाराला सुरवात स्वयंरोजगाराला मिळेल संधी : शेख

Goa Ganesh Chaturthi 2023: वाळपईत चतुर्थी बाजाराला सुरवात
Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak

Goa Ganesh Chaturthi 2023: चतुर्थी बाजाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्ण रोजगार मिळून आर्थिकदृष्ट्या फायदा व्हावा यासाठी हा बाजार भरविण्यात आला आहे. प्रत्येक महिलांची आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Drug Case: ‘ड्रग्ज’प्रकरणी गोवा-महाराष्ट्र सीमेवरील ‘सासोली’ रडारवर

गणेशचतुर्थीसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री खरेदी करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागिरकांनी खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन वाळपई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष शेहझीन शेख यांनी केले.

वाळपई नगरपालिका सभागृहात जागृती ग्राम संघटना ठाणे-सत्तरी आणि ग्रामविकास विभाग व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने चतुर्थीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चतुर्थी बाजाराच्या उद्‌घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शेख बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर सत्तरी गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे, वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस, समाजसेविका रोशन देसाई, नगरसेविका प्रसन्ना गावस, विनोद हळदणकर, गटविकास खात्याच्या दीपा परब, ग्रामसेविका हुस्ना बानु, जागृती ग्राम संघटनेच्या अध्यक्षा प्रणिशा गावकर आदींची उपस्थिती होती.

चार दिवस बाजार

यावेळी चतुर्थी बाजाराला खाद्यपदार्थ, कपडे, सजावटीचे साहित्य, बांबूचे साहित्य तसेच अन्य दुकाने थाटण्यात आलेली आहेत. शुक्रवार, 15 ते सोमवार, 18 तारखेपर्यंत हा बाजार सकाळी १० ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत चालणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com