Ganesh Gaonkar Dainik Gomantak
गोवा

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Assembly Speaker Ganesh Gaonkar: विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये झाली होती. तेव्हा आमदारांना शपथ देण्यासाठी ज्येष्ठ सदस्य म्हणून गावकर यांना मान देण्याचे सरकार पक्षाकडून निश्चित झाले होते.

Sameer Panditrao

पणजी: हुकलेले हंगामी सभापतिपद ते सभापतिपद, असा प्रवास गणेश गावकर यांनी साडेतीन वर्षात केला आहे. तत्कालीन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी घटनेत हंगामी सभापतिपद ही तरतूदच नाही, असे सांगत गावकर यांना हंगामी सभापती म्हणून शपथ देण्यास नकार दिला होता.

विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये झाली होती. तेव्हा आमदारांना शपथ देण्यासाठी ज्येष्ठ सदस्य म्हणून गावकर यांना मान देण्याचे सरकार पक्षाकडून निश्चित झाले होते. त्याआधी हंगामी सभापती म्हणून त्या सदस्याला राज्यपालांनी शपथ देण्याची पद्धत होती.

मात्र, तेव्हा राज्यपालपदी होते पिल्लई. पिल्लईंनी हायकोर्टात हयातभर वकीली केली होती. राज्यघटनेचा तर त्यांचा गाढा अभ्यास. मुख्यमंत्री सावंत, गावकर, विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन हे सारे राजभवनावर पोचले होते. राज्यपाल कधी गावकर यांना हंगामी सभापतिपदाची शपथ देतात, याकडे त्यांचे लक्ष होते.

सकाळचे १०.३० होत आले व राज्यपाल घटनेची प्रत घेऊन आले. उपस्थितांना पुढे काय वाढून ठेवलेय, ही कल्पना आली नाही. राज्यपाल म्‍हणाले घटनेत हंगामी सभापती ही तरतूद नाही. घटनेच्या १८८ कलमानुसार राज्यपालांनी नव्या सदस्यांना शपथ देण्यासाठी प्रतिनिधी पाठवायचा असतो. ती व्यक्ती निवडून आलेली सदस्यच हवी,असेही नाही. त्यामुळे फारतर मी गावकरना आमदार व इतरांना आमदारकीची शपथ देण्यास माझा प्रतिनिधी, अशी शपथ देऊ शकतो.

अन् दिली आमदारकीची शपथ

राज्यपालांशी चर्चा होत गेली, मात्र ते राज्य घटनेच्या आपल्या विश्लेषणावर ठाम राहिले. अखेर गावकर यांना राज्यपालांचे प्रतिनिधी व आमदार अशी शपथ देण्यात आली. ते विधानसभेत आले आणि त्यांनी इतरांना आमदारकीची शपथ दिली. ते हंगामी सभापती होण्यापासून वंचित राहिले आणि आज ते थेट सभापती झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT