Ganesh Festival in Kuwait by Goan youth  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Festival in Kuwait: कुवेतमध्ये घुमला 'मंगलमूर्तीचा जयघोष', गोव्यातली यंग ब्रिगेड बाप्पाच्या सेवेत दंग

पक्का गोवेकर जगाच्या पाठीवर कुठेही असला तर तो आपली चतुर्थी विसरत नाही.

Kavya Powar

Ganesh Festival in Kuwait: आपल्या लाडक्या बाप्पाचे संपूर्ण जगभरात भक्तगण आहेत. त्याचप्रमाणे जगाच्या कानाकोपऱ्यात बाप्पाचा भक्त आपली भक्ती केल्याशिवाय राहूच शकत नाही. आपल्या गोव्याला संस्कृतीचे अनोखे वरदान लाभले आहे. तेच वरदान पिढ्यांपिढ्या तसेच जोपासलेही जात आहे. याचीच प्रचिती येते कुवेतमध्ये राहणाऱ्या गोव्यातल्या तरूणांवरून.

पक्का गोवेकर जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो आपली चतुर्थी कधीही विसरत नाही. गोव्यातून कामानिमित्ताने मध्य आशियातील कुवेतमध्ये राहणाऱ्या पेडण्याच्या एका तरुणाने चक्क कुवेतमध्ये गणेशोत्सव साजरा करून आपल्या संस्कृतीची मूळे तिथल्या मातीतही रोवली आहेत.

पेडण्याचा रुपेश भिकाजी केरकर आणि त्यांच्या मित्रांनी कुवेतमध्ये पाच दिवसांचा गणपती बसवला आहे. यात अविनाश रेवणकर, राज परब, चेतन गुरव, मंथन उसगावकर आणि खेलन फथन या मूळ गोमंतक तरुणांची आणि कुवेतमध्ये राहणाऱ्या युवकांची साथ लाभली आहे.

कुवेत सारख्या आखाती देशात बाप्पाचा सण साजरा केला जातोय हा सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे. आनंदाची बाब म्हणजे, अनेकजण या गणपतीच्या दर्शनाला येत असल्याचे रुपेश सांगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रवींचा वारसा पुढे कोण चालवणार? रॉय का रितेश कोणाला मिळणार उमेदवारी? फोंड्यात लवकरच होणार पोटनिवडणूक

Viral Video: दिल्ली हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी दरम्यान वकिलानं घेतला महिलेचा कीस; नंतर काय घडलं? जाणून घ्या

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT