Ganesh Chaturthi Market in Canacona  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi : काणकोणमध्ये 20 तारखेपासून भरणार स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार

माटोळी, फराळाचे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध : स्थानिकांना संधी

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राज्यभरात स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार भरविण्याचे सरकारने ठरवले असून त्याअंतर्गत काणकोणातही चावडी येथील कदंब बसस्थानकाच्या आवारात हा बाजार 20 ऑगस्टपासून भरविण्यात येणार आहे. या बाजारात एकूण 70 दालने असतील.

यासंदर्भात काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तालुका नोडल अधिकारी विनायक वळवईकर आणि स्वयंसाहाय्य गटांच्या बैठकीत बाजाराची रूपरेषा ठरविण्यात आली.

बाजारात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ज्यांना या बाजारात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी नोडल अधिकारी विनायक वळवईकर यांच्याशी वा संबंधित पंचायत क्षेत्राच्या स्वयंपूर्ण मित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बाजारात प्रामुख्याने चतुर्थीनिमित्त लागणारे माटोळी आणि फराळाचे साहित्य मांडले जाणार असून पाच पाल्यांच्या भाजीचे वेगळे दालन, हे त्याचे खास वैशिष्ट्य राहणार आहे. माटोळी, केळी, पूजा साहित्य, भाजीपाला, मिठाई, मसाले, लोणची व पापड, नारळ, फुले, मखर, पत्रावळी आणि केळीची पाने, लाकडी वस्तू, स्थानिक फळे अशी वेगवेगळी दालने असतील. याशिवाय बांगड्या, घुमट, विजेच्या रोषणाईचे साहित्य, रांगोळी, सेंद्रिय गूळ यांचीही दालने असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: भारत माझ्यासाठी मंदिरासमान! माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, पाकिस्तानी क्रिकेटरने ट्रोलर्सला पहिल्यांदाच दिलं उत्तर! पोस्ट चर्चेत

Goa Crime: फेरीबोटीतील कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; मुख्य संशयितासह दोघांना अटक

Goa Politics: "अमित शहा, या भाजपचे ढोंग पाहा", काँग्रेसचा गृहमंत्र्यांना संदेश; 'म्हजे घर' योजनेवर प्रश्नचिन्ह

'प्रमोद सावंतांमध्ये रोखण्याची हिम्मत नाही', जमिनीचा मालकी हक्क देण्याचा केजरीवालांनी 'मये'वासीयांना केला वायदा

Goa Crime: सुर्ला येथे फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT