Ganesh Chaturthi: जनसेवा हेच ध्येय नजरेसमोर देऊन, ग्राहकांना उत्तम प्रतिचा माल माफक दरात देण्याच्या प्रयत्नात बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीने या सणासुदीच्या महिन्यात तीन कोटींची उलाढाल केल्याच्यी माहिती या सोसायटीचे चेअरमन धर्मा चोडणकर यांनी माध्यमांना दिली. सोमवारी, गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पत्रकारांशी ते वार्तालाप करीत होते. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत शेटगांवकर, संचालक प्रमोद कर्पे, शशिकांत कांदोळकर, नारायण राटवड व प्रभारी सरव्यवस्थापिका संजना राऊत या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
धर्मा चोडणकर म्हणाले की, आम्ही ग्राहकांना छापील किंमतीच्या दराखाली वस्तू विकतो. तसेच भागधारकांसाठी 22 टक्के सूट व 20 टक्के लाभांश देतो. गेल्यावर्षी कोरोनामुळे उत्पन्नात घट झाल्याने केवळ 10 टक्के लाभांश द्यावा लागला. यंदा मात्र, 20 टक्के लाभांश देण्याचा इरादा आहे. आमचा कर्मचारी वर्ग हा एका परिवारातील सदस्यासारखाच भाग आहे.
त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून त्यांना चतुर्थीत उत्तेजनार्थ अर्थसहाय्य तर दिवाळीत बोनस देत असतो. त्यांच्या विम्याचे संरक्षणक कवचही देण्यात आले. सरकारने जाहीर केलेल्या रोजगारापेक्षा अधिक पैसे त्यांना आम्ही देत असतो, असेही चोडणकर म्हणाले.
बार्देश बाजारला अग्रगण्य संस्था बनवताना सहकार क्षेत्रातील मॉल उभारण्याचे प्रयत्न चालू आहेत. येत्या वर्षभरात बांधकामास प्रत्यक्षात सुरवात होईल. सध्या मुख्यालयात स्वस्त दराने औषधे देण्यासाठी ‘जेनेरिक फार्मसी’ सुरु करण्यात येत आहे. तर उत्तर प्रकारची ताजी भाजी ग्राहकांना माफक दरात मिळावी म्हणून फळभाज्यांचे दालन सुरु केल्याचे चोडणकरांनी सांगितले.
* आता होम डिलीवरीचा संकल्प
संस्थेचा होम डिलीवरीचा इरादा असून मडगाव शाखा नव्या जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. यावेळी संस्थापक भाई खलप यांच्या प्रेरणेने तयार झालेल्या संस्थेला स्व. रामकृष्ण डांगी, स्व. गुरुनाथ धुळापकर व स्व. डॉ. मोरजकर यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे आवर्जून सांगावेसे वाटते, असेही धर्मा चोडणकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.