गणरायाच्या आगमणाला वरुणराजा ही लावणार हजेरी, IMD ने वर्तवली शक्यता

गणेश चतुर्थीला तुरळक पावसाची शक्यता
Ganesh news
Ganesh newsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात ऑगस्ट महिन्यात शहरी भागात पावसाने एकदम पाठ फिरविल्याचे चित्र आहे. मात्र, 1 सप्टेंबर पर्यंत राज्यात यलो अलर्ट जारी असून काही भागात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आलेली आहे.

(Occasional rain likely on September 1 on Ganesh Chaturthi in Goa)

Ganesh news
300 वर्षांची परंपरा सांगणारे वांते येथील गणेश मंदिर

पणजी समुद्रसपाटीपासून 1.5 ते 4.5 किमी उंचीच्या दरम्यान राज्यात पूर्वेकडील वाऱ्याच्या घटकांसह, आज पासून पुढील 2 दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. गोवा वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल म्हणाले, की राज्यात पुढील काही दिवस निश्‍चितपणे पाऊस बरसेल. मात्र, तो सातात्याने पडत राहील असे नाही.

Ganesh news
Goa Update: राज्यात कोरोनाचे 150 नवे रुग्ण; बळींची संख्या मात्र शून्यावर

31 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला घाटालगत असलेल्या तालुक्यात सत्तरी धारबांदोडा तालुक्यात मध्यमस्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात एकूण 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आत्तापर्यंत राज्यात एकूण 2375 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी पावसाच्या तुलनेत -11.1अंश सेल्सिअस कमी पाऊस बरसला आहे. आज पणजी येथे कमाल 28.8 अंश सेल्सिअस तर किमान 24.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com