Gaundalim Old Goa railway overbridge Dainik Gomantak
गोवा

Gandaulim: गवंडाळी रेल्वे उड्डाणपुलाचे काम कुर्मगतीने! वाहनांची ये-जा सुरूच; सरकारचा बंदी आदेश बसवला धाब्यावर

Gaundalim Old Goa railway overbridge: गवंडाळी-जुने गोवे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या अत्यंत संथगतीने सुरू असून पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

खांडोळा: गवंडाळी-जुने गोवे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या अत्यंत संथगतीने सुरू असून पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात या मार्गावर २४ तास वाहतूक सुरू आहे, बंदी आदेश असूनही या वाहनांची ये-जा सुरूच आहे. जुने गोवे व गवंडाळीच्या बाजूला रस्ता बंदची नोटीस असलेल्या बॅरिकेटस सरकवून वाहतूक सुरू आहे. संबंधितांच्या दुर्लक्षामुळेच गेले वर्षभर अपेक्षित गतीने काम झाले नाही, त्यामुळेच हा प्रकल्प रखडला आहे.

या मार्गावर ‘रस्ता बंद’साठी बॅरिकेटस् घातलेल्या होत्या. त्या सरकवून दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा सुरू आहे. या मार्गावर बाजूला वाहतूक पोलिस तैनात असतात, पण गेल्या काही दिवसात फक्त जुने गोवेच्या बाजूलाच वाहतूक पोलिस असल्यामुळे माशेल, कुंभारजुवेकडून वाहने थेट जुने गोवेपर्यंत येत आहेत. त्यांना कुठेही आडवले जात नाही.

कारण येथील कामाला गती नाही, शिवाय रविवारी कामच बंद होते. नेहमीही फक्त रस्त्याचे काम सुरू दिसते. पण पुलाच्या कामाला गती दिसत नाही. पर्वरीतील उड्डाण पुलाचे ज्या गतीने काम चालले आहे, त्याप्रमाणे या पुलांचे काम केले असते तर नियोजित वेळेत हा पूल वाहतुकीस खुला झाला असता, असे प्रवाशांचे मत आहेत.

या प्रकल्पाच्या कामासाठी ३० मे २०२६ पर्यंत रस्ता ठराविक वेळेत बंद ठेवण्याचे आदेश ‘जीएसआयडीसी’ने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

सुमारे ३८ कोटी रुपये खर्चाचे या उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण होईल, असे स्थानिक आमदारांनीही जाहीर केले होते. पण कामाला गतीच नसल्याने पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे स्थानिकांतून संताप व्यक्त होत आहे.

आमदारांनी प्रयत्न करावा!

स्थानिक आमदारांनी पूर्वी ३० मेपर्यंत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, सध्याची कामाची गती पाहता ही मुदत पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. अगदी डिसेंबरपर्यंतही हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही, याबाबतही अनिश्चितता व्यक्त केली जात आहे. आमदार राजेश फळदेसाई यांनी या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT