Goa Casino Dainik Gomantak
गोवा

कारवाईच्या भीतीने दक्षिण गोव्यातील जुगार अड्डे बंद

मडगावातील मिनी कसिनोवर कारवाईनंतर अड्डेवाल्यांचं धाबं दणाणलं

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव येथील एका मिनी कसिनो जुगार अड्ड्यावर कारवाई करून 9 जणांना मडगाव पोलिसांनी अटक केल्यानंतर आता अड्डेवाल्यांचं धाबं दणाणलं आहे. दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्डेवाल्यानी आपला व्यवहार काही काळासाठी बंद ठेवण्याचे ठरवले आहे.

दोन दिवसापूर्वी मडगाव पोलिसांनी मडगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या जवळ चालत असलेल्या मिनी कसिनोवर कारवाई करून 9 जणांना अटक केली होती. याबरोबरच 2 लाख तीस हजार रुपयांचा ऐवजही जप्त केला होता. त्यामुळे मडगावसहित केपे, सावर्डे, कुडचडे, फोंडा या ठिकाणी जुगाराचा अड्डा चालवत असलेल्यांचे धाबे दणाणले आहे. भीतीने त्यांनी आपला व्यवसाय काही काळासाठी बंद ठेवल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली होती. या प्रमाणे इतर ठिकाणीही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती फुटल्याने या जुगार व्यवसायिकांनी आपला धंदाच बंद ठेवला आहे.

मडगाव खारेबांध हा परिसर जुगार अड्ड्यासाठी प्रसिद्ध आहे. गोव्यातील अनेक ठिकाणाहून जुगार खेळणारे येथे येत असत. यात मिनी कसिनो, सिंडिकेट रमी, तीन पत्ती, बेकायदेशीर लॉटरी असल्या प्रकारचे 15 ते 20 च्या आसपास जुगार अड्डे असून यातील काहींनी आपला व्यवसाय इतर ठिकाणी हलविला आहे. तर काहींनी काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . याबरोबरच ग्रामीण भागातील जुगार व्यवसायिकही या कारवाईने धास्तावलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT