Goa Casino Dainik Gomantak
गोवा

मडगाव शहराला जुगाराचा 'विळखा'

पोलिसांचे दुर्लक्ष: मटका व्यवसाय तेजीत; सुजाण नागरिकांकडून नाराजी

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव शहराला जुगाराचा विळखा पडला असून, ठिकठिकाणी मटका जुगाराची पाटी लावलेली दिसत आहे. याबरोबरच काही ठिकाणी पत्त्यांचा जुगार, कॅसिनोसह इतर प्रकारचे जुगार चोरीछुप्या पद्धतीने चालत आहेत. या जुगारावर पोलिसांकडून का कारवाई होत नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

गांधी मार्केट, ओल्ड मार्केट, जुने बस स्थानक, मेट्रोपॉल, खारेबांद, ओल्ड स्टेशन रोड हे परिसर मटका जुगाराचे प्रमुख अड्डे असून येथे खुल्लमखुल्ला पोलिसांच्या डोळ्यांदेखत रस्त्यालगत मटका व्यवसाय तेजीत सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांच्या फेऱ्या चोवीस तास सुरू असतात; मात्र कोणताही पोलिस अधिकारी या मटकेवाल्यांवर कारवाई करण्याचे धाडस करत नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून काही ठिकाणी मटकेवाल्यांवर धाडी टाकण्यात येत असल्या तरी उघड्यावर मटका घेणाऱ्यांवर थेट कारवाई का केली जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

काही ठिकाणी पत्त्यांचा जुगारही जोरात सुरू आहे. खारेबांद परिसर त्यासाठी परिचित असून या ठिकाणी गोव्यातील अन्य भागांतून पत्त्यांचा जुगार खेळण्यासाठी माणसे येतात, अशी माहिती मिळाली आहे. याबरोबरच काही ठिकाणी कॅसिनो हा जुगारही पोलिसांच्या नजरेआड चालत आहे. मडगाव शहर जुगाराच्या विळख्यात आकंठ बुडाले आहे आणि स्थानिक पोलिस डोळेझाक करत असल्याने मडगावातील सुजाण नागरिकांकडून नाराजी वक्त करण्यात येत आहे.

मडगाव शहर ही राज्याची आर्थिक राजधानी म्हणून सर्वपरिचित असली तरी या शहराला जडलेला जुगारचा विळखा पाहता भविष्यात ती जुगाराची राजधानी होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

पैशांसाठी मुलेही मटका व्यवसायात

मडगाव शहर परिसरात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला एक टेबल, खुर्ची टाकून पोलिसांचा वरदहस्त असल्यासारखा बिनदिक्कत हा बेकायदेशीर व्यवसाय चालत आहे. मडगाव येथील अपोलो इस्पितळ ते नव्या स्टेशनला जाण्याच्या ठिकाणी असलेल्या रोडवर मटका घेणारा एक वयस्क आपण अनुपलब्ध असल्यास आपल्या अल्पवयीन मुलाना मटका घेण्यासाठी बसवत असल्याची माहिती मिळाली आहे.

असाच प्रकार इतर ठिकाणीही घडत आहे. मटका घेणारे काही कामानिमित्त बाहेर गेल्यास आपल्या मुलाला किंवा नातेवाईकाला मटका घेण्यासाठी बसवत आहेत. कामधंदा उपलब्ध नसल्यानेही काही मुले या व्यवसायाकडे वळत आहेत. तसेच काही मुलांचे आईवडील आजारी असल्याने त्यांच्या औषध पाण्याचा खर्च भागवण्यासाठी ते या बेकायदेशीर व्यवसायाकडे वळत आहेत. त्यांना एका दिवसाकाठी 700 ते 800 रुपये तसेच जास्त रुपयांची मटका बिट आणल्यास कमिशनही मिळत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याशिवाय शालेय तसेच महाविद्यालयीन मुलेही मटका खेळताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मानकुरादची नवी कलमे लावा, उत्‍पन्न वाढवा", CM सावंतांचं शेतकऱ्यांना आवाहन; प्रतिहेक्‍टर मिळतंय 2 लाख रुपयांचे अनुदान

Goa Assembly: 'किनारी भागात भटकी कुत्री, जनावरांवर निर्बंध आणा', जीत आरोलकरांची मागणी

Land Fraud: बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रकार! खोर्जुवे येथील घटना, दोघांना अटक

Panjim: लाँड्रीला आग, 'नॅशनल' परिसरात खळबळ, अग्निशमन दलामुळे मोठी दुर्घटना टळली

Beef Smuggling: नावेलीत बेकायदा कत्तलखान्याचा पर्दाफाश, 700 किलो गोमांस जप्त! एकाला अटक

SCROLL FOR NEXT