'जूनपर्यंत आयुष इस्पितळ होईल सुरू'

मुख्यमंत्री: पेडणे पालिका इमारतीची पायाभरणी
AYUSH hospital to start by June
AYUSH hospital to start by JuneDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: येत्या 15 ऑगस्ट रोजी मोपा विमानतळ कार्यान्वित होणार आहे. तर जूनमध्ये आयुष इस्पितळ व आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल. तसेच धारगळ येथे जीसीए चे क्रिकेट स्टेडियमही दोन महिन्यात क्रीडाप्रेमींसाठी उपलब्ध होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी येथे बोलताना केली.

पेडणे पालिकेच्या नव्या इमारतीची मंगळवारी पायाभरणी केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रवीण आर्लेकर ,जीत आरोलकर, नगराध्यक्ष उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, नगरसेवक विष्णू साळगावकर, शिवराम तुकोजी, माधव देसाई, सिध्देश पेडणेकर, अश्विनी पालयेकर, विशाखा गडेकर, राखी कशालकर, तृप्ती सावळ देसाई, मुख्याधिकारी मनिष केदार, पेडणे भाजप अध्यक्ष तुळशीदास गावस हे व्यासपीठावर होते. नऊ कोटी रुपये खर्चून ही पेडणे पालिकेची सुसज्ज इमारत उभारली जात आहे. अशाच प्रकारे ग्रामपंचायतींच्या इमारती बांधून त्यातून विकास साधला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

AYUSH hospital to start by June
बलात्कारी आरोपींना फाशीची शिक्षा द्या: प्रतिमा कुतिन्हो

आमदार जीत आरोलकर म्हणाले की, पेडणे नगरपालिकेची नवी इमारत होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. येथील गुरवारचा आठवडी बाजार रस्त्यावर भरतो. त्यामुळे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवावी लागते. शहरात वाहतुकीचा ताण कमीकरण्यासाठी डॉ. शिरोडकर दवाखाना व व्हायकाउंट हायस्कूल या मध्यवर्ती जागेतून बगल रस्ता न्यावा. आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, यापूर्वी येथे काम करण्याऐवजी जास्त बोलत, पण मी कमी बोलून जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन. रविना हरमलकर यांनी स्वागत केले. राजू बोंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. मनोज हरमलकर यांनी आभार मानले.

AYUSH hospital to start by June
गोव्यातील मंत्र्यांना झाली 'वीजखरेदी' घोटाळ्याची आठवण

मोपा परिसरात ‘एव्हीएशन सेंटर’

मोपा विमानतळ सुरू होण्याअगोदर येथे ‘एव्हीएशन सेंटर’ सुरू केले आहे. त्याचप्रमाणे (आयटीआय) औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातही विमानोड्डाणाशी निगडित प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू केले जाणार आहे. युवकांनी प्रशिक्षण घेऊन त्याद्वारे रोजगार मिळवावा, तसेच स्वंय रोजगारही उभा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com