Gajendra Singh Shekhawat  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यासाठी केंद्राची नवी पर्यटन योजना, जुने गोवेतील ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणार; केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची माहिती

Gajendra Singh Shekhawat Goa visit: देशात जागतिक दर्जाची ५० प्रतिष्ठित पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी केंद्र सरकार नवी योजना आखत आहे. या योजनेअंतर्गत गोव्यातही अशी पर्यटनस्थळे विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: देशात जागतिक दर्जाची ५० प्रतिष्ठित पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी केंद्र सरकार नवी योजना आखत आहे. या योजनेअंतर्गत गोव्यातही अशी पर्यटनस्थळे विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यटन आणि कला व संस्कृतीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी दिली. अटल भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नीलेश काब्राल, भाजप प्रवक्ते रुपेश कामत, दयानंद कार्बोटकर, सिद्धेश नाईक आदी उपस्थित होते.

शेखावत म्हणाले की, केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत जुने गोवे येथे उभारण्यात येणाऱ्या ‘हेरिटेज इंटरप्रिटेशन सेंटर’चे काम उत्खननादरम्यान ऐतिहासिक वस्तू सापडल्याने थांबवण्यात आले आहे. या वस्तूंचे पुरातत्त्वीय महत्त्व लक्षात घेता त्या नष्ट होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम घाईने पुढे नेणे योग्य ठरणार नाही. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे केंद्र उभारता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एसआयआर प्रक्रियेचे समर्थन करताना शेखावत म्हणाले की, देशभरातील मतदारांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात ११ वेळा एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसने त्याला आक्षेप घेतला नव्हता.

‘एसआयआर’ला विरोध करण्यामागे काँग्रेसचा अजेंडा काय?

भारतात (India) दरवर्षी ८० लाख ते एक कोटी नागरिकांचा मृत्यू होतो. त्यामुळे गेल्या २० वर्षांत सुमारे २० कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत झालेल्या अनेक नागरिकांची नावे अद्याप मतदारयाद्यांत आहेत. तसेच, विविध कारणांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे दोन्ही राज्यांच्या मतदारयाद्यांत आढळतात. याशिवाय, इतर देशांतून बेकायदेशीररीत्या आलेल्या घुसखोरांची नावेही मतदारयाद्यांत समाविष्ट आहेत. अशी नावे वगळण्यासाठीच एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे, असा दावा शेखावत यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally: रामलीला मैदानावर 1977 नंतरचे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन; पण 'पुढे काय?' हा कळीचा प्रश्न कायम!

Plane Crash Video: भररस्त्यात विमान कोसळलं अन् आगीचा भडका उडाला! भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

IND vs NZ ODI: भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का! 2 स्टार खेळाडू अचानक बाहेर, आता संघासमोर नवं आव्हान

RGP Congress Alliance: ''12 जागा द्या, नाहीतर स्वतंत्र लढा", आरजीचा काँग्रेसला अल्टीमेटम; आघाडीचा तिढा कायम

खरी कुजबुज: अन् सुतासारखे झाले सरळ

SCROLL FOR NEXT