Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

162 Russian Tourists Goa: रशियातील येकातेरिनबर्ग येथून १६२ विदेशी पर्यटकांना घेऊन आलेले २०२६-२७ पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान बुधवारी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.
162 Russian Tourists Goa
Goa TourismDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: रशियातील येकातेरिनबर्ग येथून १६२ विदेशी पर्यटकांना घेऊन आलेले २०२६-२७ पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान बुधवारी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या विमानाच्या आगमनाने गोव्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटन हंगामाला अधिकृत सुरुवात झाली.

विमानतळावर पर्यटकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शिष्टाचार व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकारी आकाश दीप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

जागतिक पातळीवरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गोवा हे देशी तसेच विदेशी पर्यटकांसाठी सुरक्षित पर्यटनस्थळ आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तयारी सुरू आहे. वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज होत आहे.”

- माविन गुदिन्हो, शिष्टाचार व वाहतूकमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com