PHC Corlim, G20 Goa Dainik Gomantak
गोवा

Corlim PHC: स्कॅन ओपीडी, आयुष्मान भारत, डिजिटल हेल्थसाठी खोर्ली ठरणार आदर्श उदाहरण, G20 चे प्रतिनिधी देणार भेट

Pramod Yadav

गोव्यातील G20 शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीला अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. राज्य सरकारच्या वतीने सध्या या आगामी बैठकांच्या पार्श्वभूमीवर जोरात तयारी सुरू आहे.

G20 बैठकीदरम्यान कव्हर केल्या जाणार्‍या विमानतळांपासून ते विविध मार्गापर्यंत सजावट केली जात आहे. प्रतिनिधींना उत्तम अनुभव देण्यासाठी मार्गांवर हिरवळ आणि सुशोभीकरण केले जात आहे. असे गोव्याच्या G20 चे सचिव प्रोटोकॉल आणि नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स म्हणाले.

शिखर परिषदेच्या प्रतिनिधींना वैद्यकीय सुरक्षा देण्यापासून ते सर्व ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने एक समर्पित टीम सज्ज केली आहे. वैद्यकीय सुरक्षेत इतर वैद्यकीय सुविधांव्यतिरिक्त जीवनरक्षक रुग्णवाहिका सेवांचा समावेश असेल.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य सेवा संचालनालय आणि EMRI 108 मधील डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना बैठकांसाठी अतिरिक्त प्रशिक्षिण दिले जात आहे.

दरम्यान, वेगाने प्रगत आणि डिजिटल होणाऱ्या जगात, आरोग्य विभागाने गोव्यातील डिजिटल आरोग्य सेवेत काही लक्षणीय बदल केले आहेत. शिखर परिषदेच्या प्रतिनिधींना भेटीदरम्यान या सेवा दाखवल्या जातील.

"आरोग्य व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत, प्रतिनिधींना खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC Corlim) दाखविण्यात येणार आहे. खोर्ली येथे ऑनलाइन रूग्ण नोंदणी, उपचार पद्धती, स्कॅन ओपीडी यांचा परिचय करून दिला जाणार आहे. याशिवाय आयुष्यमान भारत या योजनेची देखील माहिती दिली जाणार आहे.

PHC खोर्ली 'डिजिटल हेल्थ'चे एक उदाहरण प्रस्थापित करत आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या स्कॅन आणि शेअर सुविधेसह "ई-सुश्रुत एचएमआयएस'चा (E-Sushrut HMIS) वापर, आरोग्य सेवेत बदल घडवत आहे. असे गोवा सरकारने म्हटले आहे.

खोर्ली PHC मध्ये, रूग्ण नोंदणी, सामान्य ओपीडी, फिजिओथेरपी, दंत ओपीडी, नेत्ररोग ओपीडी, आयुर्वेदिक ओपीडी, फार्मसी आणि ई-सुश्रुत प्रयोगशाळेचे एकत्रीकरण रुग्ण आणि आरोग्य सेवेसाठी महत्वाचा बदल ठरेल. असेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT