Goa Beach Watersports: मे अखेर जलक्रीडा प्रकल्प तयार - डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री ः पर्यटन, जलक्रीडा शाखेचा अभ्यासक्रम होणार सुरू
Dr.Pramod Sawant
Dr.Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : दोना पावला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स कॅम्पस (निव्हस) मे महिन्याअखेर तयार होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. या संस्थेच्या प्रस्तावित इमारतीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

२०१४ मध्ये सुरू झालेला दोना पावला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स कॅम्पस मे २०२३ अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली.

Dr.Pramod Sawant
CM Pramod Sawant : जलक्रीडा प्रकार ‘जैसे थे’ स्थितीत

प्रकल्प २०१४ मध्ये सुरू झाला असला, तरी कोविड महामारी, केंद्र सरकार आणि गोवा साधन सुविधा विकास महामंडळ यांच्यातील समन्वयासंबंधीच्या समस्यांमुळे लांबला असेही ते म्हणाले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स (एनआयडब्ल्यूएस) गोवा, हे भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्था (आयआयटीटीएम) अंतर्गत कार्यरत असलेले केंद्र आहे, जे पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्रीय स्वायत्त संस्था आहे,

जलक्रीडा आणि संबंधित प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रासाठी या संस्थेत देशभरातून सुमारे २५०० स्नातक अल्प आणि दीर्घकालीन अभ्यासक्रमांचा लाभ घेतात. संस्थेत सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस) शिकवले जातात. सध्या पदवी आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना सुरू आहे.

Dr.Pramod Sawant
CM Pramod Sawant: 'या' तारखेपर्यंत पूर्ण होणार नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्युटचे काम; मुख्यमंत्र्यांची माहिती

अधिकाऱ्यांसह प्रकल्पाची पाहणी

दोना पावला येथील जलक्रीडा प्रकल्पाला दिलेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला आणि प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. रणजीत सिंग, एनआयडब्ल्यूएसचे व्यवस्थापक (प्रशिक्षण), कमल पराशर, एनआयडब्ल्यूएसचे लेखा अधिकारी, समीर कर्पे, प्रशिक्षक एनआयडब्ल्यूएस उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com