Matoli Bazar In Goa Dainik Gomantak
गोवा

Matoli Bazar: म्हापशात माटोळी बाजारासाठी संपूर्ण ‘लेन’

बाजार समितीची शिफारस: आज पालिका मंडळ बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता

दैनिक गोमन्तक

Matoli Bazar In Goa: गणेश चतुर्थी सणाच् पार्श्वभूमीवर म्हापसा पालिका बाजार समितीने मार्केटमधील एक संपूर्ण लेन माटोळी विक्रेत्यांसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, बाजार समितीने चतुर्थीच्या काळात नवीन केटीसी बसस्थानकाजवळ चार दिवस वाहने पार्क करण्याची शिफारसही केली आहे.

म्हापसा पालिका बाजार समितीचे अध्यक्ष आशीर्वाद खोर्जुवेकर यांनी सांगितले की, ग्राहक व विक्रेत्यांच्या सोयीसाठी पारंपरिक माटोळी बाजाराला केवळ एका लेनमध्ये, जे.के. वाईन्सपासून नास्नोडकर दुकानांपर्यंत परवानगी दिली जाईल. या माटोळी बाजारामध्ये भाजीपाला व फळ विक्रेत्यांना परवानगी दिली जाणार नाही.

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पहिल्या लेनमध्ये विक्रेत्यांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. लेनचा वापर सामान्यतः पार्किंगसाठी केला जातो. परंतु, चतुर्थीच्या काळात मार्केटमध्ये लोकांना मोकळेपणाने चालता यावे, याकरिता यावेळी पार्किंगला परवानगी नसेल, असेही खोर्जुवेकर म्हणाले.

दीड बाय दीड मीटरची पूर्व-चिन्हांकित जागा सर्व विक्रेत्यांना दिली जाईल आणि तीच क्रमांक देऊन निश्‍चित केली जाईल, असेही खोर्जुवेकर म्हणाले.बाजार समितीची नुकतीच बैठक होऊन वरील सर्व निर्णय घेतले गेले असून, ते आता बुधवार, ६ रोजी होणाऱ्या पालिका मंडळाच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत.

दरम्यान, नवीन केटीसी बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेवर दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग चतुर्थीच्या काळात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव बाजार समितीने मांडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

SCROLL FOR NEXT