Frog  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात बेडकांची शिकार? रेस्टॉरंटकडून मागणी होत असल्याची तक्रार, सामाजिक संघटनांनी व्यक्त केली चिंता

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत बेडकांना पकडणे, त्यांची हत्या आणि त्यांचा खाद्यपदार्थात वापर यावर बंदी घालण्यात आली आहे.

Pramod Yadav

Frog Poaching Goa

गोव्यात बेडकांच्या अवैध शिकारीबाबत सामाजिक संघटना गोवाकॅनच्या वतीने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाळ्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर बेडूक बाहेर येतात, त्यांची शिकार करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते, त्यामुळे याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत गोवाकॅनच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.

गोव्यातील विविध हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये येणारे ग्राहक बेडकांच्या मांसाची मागणी करतात. त्यासाठी बेडूक पुरवण्यासाठी स्थानिकांची मदत घेतली जाते. असे सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत बेडकांना पकडणे, त्यांची हत्या आणि त्यांचा खाद्यपदार्थात वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. असे गोवाकॅनचे समन्वयक रोनाल्ड मार्टीन यांनी हेराल्ड या इंग्रजी दैनिकाला माहिती देताना सांगितले.

पावसाळ्यात मोठ्या प्रमणावर बेडूक बाहेर येतात, शेतात आणि वन्य परिसरात अधिक प्रमाणावर बेडूक सापडतात. दरम्यान, बेडकांच्या शिकारीविरोधात जनजागृती गरजेची असल्याचे मत गोवाकॅनच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

बेडकांच्या शिकारीबाबत शेती, वन परिसरात सध्या आम्ही लक्ष ठेऊन आहोत, वारंवार तपासणी केली जात आहे. गोवाकॅनच्या वतीने सेव्ह फ्रॉग मोहिमेची घोषणा केली आहे.

मलेरिया तसेच विविध आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांना खाण्याचे काम बेडूक करतात. बेडकांची होणारी हत्या यामुळे अन्न साखळी विस्कळीत होते. असे मत गोवाकॅनच्या समन्वयकांनी म्हटले आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून बेडकाच्या मांसाची मागणी केली जाते, स्थानिकांना बेडकाच्या शिकारीची माहिती असल्याने स्थानिकांना यामध्ये समावून घेतले जाते. मात्र, स्थानिकांमध्ये जनजागृती करून याला आळा घालण्याची गरज आहे. असे गोवाकॅनने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT