Frequent power outages in Mapusa Dainik Gomantak
गोवा

म्हापशात वारंवार वीज खंडित

अधिकाऱ्यांचे कानावर हात: नागरिकांकडून निवेदन सादर

दैनिक गोमन्तक

म्हापसा: म्हापसा शहरातील लोक उकाड्याने हैराण होत असताना गेल्या पंधरा दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांच्या वतीने ‘स्वाभिमानी म्हापशेकर’ या बॅनरखाली शहरातील काही समविचारी लोकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी सकाळी म्हापशातील वीज कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक निवेदन सादर केले.

म्हापसा शहरात विजेचा लपंडाव सुरू असतो, हे ऐकून कार्यकारी अभियंता प्रदीप नार्वेकर यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केले आणि आजवर या समस्येबाबत आपल्याकडे एकही तक्रार आली नसल्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. म्हापशाच्या नगरसेवक कमल डिसोझा आणि सामाजिक कार्यकर्ते नारायण राठवड यांच्या नेतृत्वाखाली भाई पंडित, श्रीकांत सीमेपुरुषकर, गुरुदास हरमलकर, प्रकाश राठोड यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

वीज खात्याचे अभियंते, लाईनमन व कर्मचारी रात्रंदिवस काम करून जनसेवा करीत आहेत, असेही त्या निवेदनात नमूद करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी वीजप्रवाह खंडित होतो हे समजून घेता येईल. परंतु इतर वेळीही वीजदाबात अचानक चढ-उतार होतात. त्यामुळे विद्युत उपकरणे निकामी होतात. तसेच तासन तास वीज गायब होते, असे नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

Raigad Fort History: रायगड जिल्ह्यातील इतिहासावर नवा प्रकाश

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT