Goa Water Problem: पिण्याच्या पाण्यासाठी जागावे लागते रात्रभर

कळंगुट-शिवोली परिसरात लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे टंचाई
Goa Water Problem
Goa Water ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

संतोष गोवेकर

कळंगुट: सध्या कळंगुटात पाण्याची समस्या इतकी तीव्र झालेली आहे की टँकरवर अवलंबून राहावे लागते. स्वातंत्र्यानंतर एकाही लोकप्रतिनिधीने शिवोली भागातील पाणी समस्येकडे गांभिर्याने बघितले नाही. त्यामुळे आजही आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत रात्री काढाव्या लागतात अशी व्यथा अमिता शिरोडकर या वृद्धेने ‘गोमंतक’शी बोलतांना सांगितली.

कळंगुट भागात असलेल्या जुन्या वाहनतळ परिसरात माजी मंत्री मायकल लोबो यांच्या प्रयत्नांनी भलामोठा दुमजली जलकुंभ उभारण्यात आला आहे. तिळारी धरणातील पाणी थेट पिळर्ण येथील औद्योगिक वसाहतीत उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकर्पात आणून त्यांवर प्रक्रिया केल्यानंतर बसस्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या जलकुंभाद्वारे पंचक्रोशीत पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स यांनी सांगितले. मात्र, 2018 सालापासून जलकुंभाचे काही तांत्रिक अडचणींमुळे बांधकाम रखडलेले आहे. त्यामुळे पाण्याच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिमाण होत असल्याचे खुद्द मार्टीन्स यांनी मान्य केले.

Goa Water Problem
फोंड्याला अजूनही घ्‍यावा लागतोय पाणी टॅंकरचा आधार!

पाण्याची तीव्र समस्यां असलेल्या गुडे तसेच दांडा या परिसरात पाण्याची एकही विहिर चांगल्या स्थितीत आढळून येत नाही. त्यामुळे नळाशिवाय पाण्यासाठी दुसरा पर्याय नसलेल्या येथील लोकांनी आतापर्यंत अनेक आंदोलने, मोर्चे तसेच संबंधित कार्यालयवर हल्लाबोल केलेला आहे असे सामाजिक कार्यकर्ते निलेश वेर्णेकर यांनी सांगितले. याभागात असलेल्या तीव्र पाणी टंचाईची जाणीव जवळपासच्या गावांनाही असल्याने अनेकदा ठरलेली लग्नेही रद्द होत असल्याचे सुमती तोरस्कर या महिलेने काकुळतीला येऊन सांगितले. गा़वाच्या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी याभागातील काही राजकारण्यांनी बाहेरचे पाणी भरमसाठ किमतीने सप्लाय करण्याचा धंदा सुरू केला असून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखाच हा प्रकार असल्याचे शिवोलीचे उप-सरपंच विलीयम फर्नांडिस यांनी ‘गोमन्‍तक’ला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com