French tourist arrested in Goa for attacking minor boy

 
Dainik Gomantak
गोवा

अल्‍पवयीन मुलाला भोसकणाऱ्या फ्रान्‍सच्या पर्यटकाला गोव्यात अटक

पर्यटक युनिस दामानी याने कुत्र्यावरून भांडण उरकून काढले व स्थानिक ऊर्मिला देसाई हिच्‍याशी हुज्जत घातली.

दैनिक गोमन्तक

आगोंद: गुरावळ-आगोंद येथे एका अल्‍पवयीन मुलाला सुऱ्याने भोसकल्याप्रकरणी फ्रान्‍सचा पर्यटक (French tourist ) युनिस दामानी याला काणकोण पोलिसांनी (Canacona Police) अटक करून त्‍याच्‍यावरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. त्‍याला न्‍यायालयासमोर (Goa Court) उभा केला असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली. दरम्‍यान, त्‍या मुलावर गोमेकॉत (GMC) उपचार सुरू असून, प्रकृती सुधारत असल्‍याची माहिती साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शनिवारी संशयित पर्यटक युनिस दामानी याने कुत्र्यावरून भांडण उरकून काढले व स्थानिक ऊर्मिला देसाई हिच्‍याशी हुज्जत घातली. यावेळी आपल्या आईला वाचवण्यास गेलेल्या तिच्या अल्पवयीन मुलाच्या पोटात त्‍याने सुरा खुपसला. या दोघांच्‍या मदतीसाठी गेलेल्‍या प्रवीण देसाई याच्या हातावरही त्‍याने सुऱ्याचा वार केला. त्यांच्या दोन बोटांना इजा झाली. जखमींना उपचारार्थ इस्पितळात दाखल केले होते. त्‍यानंतर मुलाला पुढील उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्‍यात आले आहे.

दरम्‍यान, पर्यटक युनिस दामानी यानेही काणकोण पोलिसांत आपल्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपीच्या डोक्याला जखम झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे आगोंद भागात संताप व्यक्त केला जात असून देश विदेशी पर्यटक सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास नियमांचे उल्लंघन करत आहेत. ‘जिवाचा गोवा’ करण्यास आलेल्या या पर्यटकांना पोलिसांचीच नव्हे तर कोणाचीही भीती नाही. ते स्थानिकांच्या जीवावरच उठले असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते, असे काणकोण पत्रकारसंघाचे अध्यक्ष बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT