गुळेली ग्रामसभा सोमवारी परत होणार

पंचायत सचिव विनायक गावकर यांच्या बदलीवर आलेल्या सचिव गुरुनाथ केरकर यांना उपस्थितांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
Gram Sabha 

Gram Sabha 

Dainik Gomantak 

गुळेली: आय.आय.टी विषयावर आजची गुळेली (Guleli) ग्रामपंचायतीची ग्रामसभा (Gram Sabha) मोठी गाजणार अशी चर्चा असतानाच सरपंच अपूर्वा च्यारी , उपसरपंच नितेश गावडे , पंच अनिल गावडे, पंच तथा माजी सरपंच अस्मिता मेळेकर, ,पंच विठ्ठल कासकर ,पंच विनोद गावकर ,पंचायत सचिव विनायक गावकर , आदी अनुपस्थितीत राहील्याने बराच गोंधळ माजला. पंचायत सचिव विनायक गावकर यांच्या बदलीवर आलेल्या सचिव गुरुनाथ केरकर यांना उपस्थितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. एकमेव पंचसदस्य अर्जुन मेळेकर यांनी आज उपस्थिती लावली होती.

<div class="paragraphs"><p>Gram Sabha&nbsp;</p></div>
प्रशिक्षक फेरांडोंचा एफसी गोवाला राम राम

मागच्या रविवारी म्हणजे 12डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत आय आय टी वरुन ग्रामस्थांनी पूर्णपणे पंचायत मंडळाला कारणीभूत धरले .पंचायत मंडळापैकी अर्जुन मेळेकर हे एकमेव पंचसदस्य जे आय आयटी विरोधी लोकोसोबत होते बाकी सर्व पंच हे आय.आय.टी (IIT) समर्थनात असल्याने यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचा जाहिर निषेध केला होता . तत्कालीन सरपंच अस्मिता मेळेकर व तत्कालीन ग्रामपंचायत (Grampanchayat) सचिव यांनी लोकांपासून हा विषय लपविल्याचा आरोप शुभम शिवोलकर व इतर ग्रामस्थांनी यावेळी केला. यासाठी सरपंच व सचिव यांची चौकशी व्हावी असा ठराव यावेळी मांडला होता त्यावर आजच्या ग्रामसभेत स्पष्टीकरण मिळणार होते. त्यामुळे आजच्या ग्रामसभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

तसेच आय.आय.टी वेळी आंदोलकांवर डांबण्यात आलेले खटले मागे घेण्याचा ठराव मांडला यालाही या सभेत उत्तर मिळणार होते. आय आय टी ठिकाणी असलेल्या जमिनी संबंधितांना नावे कराव्या त्याच बरोबर गेली पन्नास साठ वर्षे जे ग्रामस्थ मेळावली भागातील जमिन कसतात त्यांना त्या त्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यास पंचायतीने पुढाकार घ्यावा असा ठराव मांडला होता त्यावर पुढे काय कारवाई झाली असाही विषय येणार होता .

एकूण ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जाण्यापूर्वीच पंचाय मंडळाने वैयक्तिक कारणे देऊन आजच्या या ग्रामसभेला अनुपस्थितीत राहण्यात धन्यता मानली. सरपंच (Sarpanch) काही दिवसांपासून रजेवर असल्याने उपसरपंच नितेश गावडे यांच्या सहीनिशी आजच्या ग्रामसभेचे निमंत्रण दिले होते परंतु पंच अर्जुन मेळेकर वगळता बाकी पंचायत मंडळ गैरहजर राहिल्याने ह्या विषयाला वेगळे वळण लागले आहे.

सकाळी दहा वाजता पंचायत कार्यालयात जमलेले लोक दुपारी तीन पर्यंत कार्यालयात होते.यावेळी बिडीओ, पंचायतीचे सचिव यांना या ठिकाणी आणण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती जो पर्यंत आम्हाला ठोस उत्तर मिळत नाही तो पर्यंत पंचायत कार्यालय सोडणार नाही असा हेका काहिंनी धरला होता.नंतर पंच अर्जुन मेळेकर यांनी सर्वांची समजूत काढून उद्या परत ग्रामसभा घेऊन या विषयी सविस्तर चर्चा करु.आजचे सचिव गुरुनाथ केरकर नविन व पूर्विच्या सचिवांच्या बदलीवर आले आहेत त्यांना एकुण परीस्थिती काय आहे याची कल्पना नाही त्यामुळे उद्या या पंचायतीचे सचिव येणार तेव्हा 12रोजीचे प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घेऊ असे ठरविले आणि ग्रामस्थांनी या ठिकाणाहून जाण्याचा निर्णय घेतला.

<div class="paragraphs"><p>Gram Sabha&nbsp;</p></div>
डिचोलीत शासकीय मुक्तीदिन सोहळा उत्साहात

उद्या सोमवारी परत ग्रामसभा

आज पंच अर्जून मेळेकर वगळता सर्व पंच मंडळी अनुपस्थितीत राहील्याने आजची ग्रामसभा झालीच नाही ग्रामस्थांच्या मागणीनुसार आजचे इतिवृत्त लिहून ठेवण्यात आले व उद्याच्या ग्रामसभेची नोटीस सर्व पंचांना पाठवा अशी मागणी केली. आजच्या बैठकीत शुभम शिवोलकर, शशिकांत सावर्डेकर, शंकर नाईक, महेश मेळेकर,प्रितेश नाईक , उन्नती मेळेकर व इतरांनी भाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com