Goa Revolution Day Celebration attended By CM, Governor Dainik Gomantak
गोवा

'गोवा मुक्तीसाठी आम्ही गोळ्या झेलल्या, तेव्हा गुन्हेगारीने बरबटलेल्या राज्याचे स्वप्न पाहिले नव्हते'; स्वातंत्रसैनिक रोहिदास देसाई

Goa Revolution Day: गुन्ह्यांनी बरबटलेल्या गोव्याचे स्वप्न पाहिले नव्हते! स्वातंत्र्यसैनिक रोहिदास देसाई; क्रांतिदिन सोहळ्यात हुतात्म्यांना अभिवादन.

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Revolution Day

पणजी: गोवा मुक्तीसाठी आम्ही गोळ्या झेलल्या तेव्हा गुन्हेगारीने बरबटलेल्या गोव्याचे स्वप्न पाहिलेच नव्हते. राज्यात वाढत असलेले पाहून मन व्यथित होते, तेव्हा ही गुन्हेगारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पावले उचलावीत, असे खडे बोल गोवा दमण दीव स्वातंत्रसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांनी सुनावले.

मुख्यमंत्री वाढते गन्हे रोखण्यास, अपघातांवर नियंत्रण आणण्यास सक्षम आहेत आणि आणि त्यांनी याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. गोवा क्रांतिदिनानिमित्त आझाद मैदान, पणजी येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी रोहिदास देसाई बोलत होते. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुदिन ढवळीकर, युरी आलेमाव, यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली.

“भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर गोव्याला स्वातंत्र्य व्हायला तब्बल १४ वर्षांचा कालावधी लागला. या काळात गोव्याच्या मुक्तीसाठी अनेकांना प्राणाची आहुती द्यावी लागली. विरासत आणि विकास हे सोबत पुढे जायला हवे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्य यावर्षी १०० टक्के साक्षर झाले आहे याचा मला अभिमान आहे,” असे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

स्वातंत्र्यसैनिकांनी मिळते म्हणून मागू नये !

हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आता स्वातंत्र्यसैनिक राहिले आहेत. आम्हाला मिळते म्हणून आम्ही सरकारकडे मागत सुटावे, असा त्याचा अर्थ होत नाही. आम्हालाच द्यावे असे म्हणू नये. जे स्वातंत्र्यसैनिक आहे त्यांनी आपल्याला मिळते त्यातून दान करायला हवे, असेही अध्यक्ष रोहिदास देसाई

'जीडीपी'त आघाडीवर !

राम मनोहर लोहिया यांचे जे स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. गोवा छोटा राज्य असला तरी 'जीडीपी'च्या बाबतीत आपण आघाडीवर आहोत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

SCROLL FOR NEXT