Adv Ramakant Khalap  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, वकील अन्‌ केंद्रीय मंत्री

Panaji News : म्हापसा न्यायालयात ते वकिली करत असत. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अकाली निधनामुळे मांद्रेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला उमेदवार हवा होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, ॲड. रमाकांत खलप यांनी यंदाच्या ३ मार्च रोजी आपल्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण केली. ३ मार्च १९७३ रोजी मांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत जिंकून ते विधानसभेत पोहोचले आणि ५ मार्च १९७३ रोजी त्यांनी विधानसभेत पहिले भाषण केले होते.

विद्यालयातील शिक्षक पुढे महाविद्यालयातील व्याख्याता अशी भूमिका बजावत त्यांनी कायद्याची पदवीही घेतली. म्हापसा न्यायालयात ते वकिली करत असत. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अकाली निधनामुळे मांद्रेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला उमेदवार हवा होता.

त्या पक्षाने खलप यांना उमेदवारी दिली आणि वकील खलप आमदार बनले. पुढे विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी कामगिरी त्यांनी बजावली. हे सारे करताना ते गोवा मुक्तीसाठीही वावरले होते, हे अनेकांना आज आठवतही नसेल. ते स्वातंत्र्यसैनिकही आहेत.

  • नाव : ॲड. रमाकांत दत्ताराम खलप

  • जन्म : ५ ऑगस्ट १९४६ (मांद्रे)

  • शिक्षण : बीएससी, एल.एल.बी.

  • व्यवसाय : वकिली, राजकारणी (सलग ५० वर्षे सक्रिय)

न्यायालयात वकिली करण्यास जाताना पूर्वकल्पना नसताना मिळाली पहिली उमेदवारी. मांद्रे मतदारसंघाचे सलग पाचवेळा व अन्य एकवेळा मिळून सहावेळा प्रतिनिधित्व.

संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांना श्रद्धांजली वाहताना सरकारचे त्यांनी पायाभरणी केलेल्या आणि पूर्ण न झालेल्या महाखाजन कोलवाळ पुलाकडे लक्ष वेधले आणि पूल पूर्ण करवून घेतला.

मगो पक्ष विलिनीकरण पत्रावर ‘मगो’च्या सर्व आमदारांनी सह्या केल्या, असा कॉंग्रेसने दावा केला होता. त्यावेळी ‘मगो’कडे खलप आणि स्व. बाबुसो गावकर हे दोघेच आमदार शिल्लक राहिले होते. खलप यांनी सही दिली; पण पक्ष दिला नाही, अशी भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात जात ‘मगो’चे अस्तित्व कायम राखले.

बार्देश बाजारची उभारणी, विस्तार

बार्देश बाजार या ग्राहक सहकारी संस्थेची उभारणी व विस्तार खलप यांनी केला आहे. मांद्रे येथे शैक्षणिक संस्थाही ते चालवतात. समोरच्या व्यक्तीला न दुखवण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतो. म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक ऑफ गोवाचे माजी अध्यक्ष म्हणूनही खलपांनी यशस्वीपणे काम केले आहे. ते गोवा कायदा आयोगाचे माजी अध्यक्षही होते. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरही खलप यांनी काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! एकाचा मृत्यू

Bicholim Car Accident: नियंत्रण सुटलं अन् कार नदीत कोसळली... चालकाची जीव वाचवण्यासाठी धडपड, सुदैवाने बचावला; डिचोलीतील घटना

SCROLL FOR NEXT