

Viral Railway Video: आपल्या देशात विद्वानांची संख्या किती आहे, हे सांगणे कठीण असले तरी, मूर्खपणाचा कळस करणाऱ्या 'नमुन्यांची' मात्र कमतरता नाही. लोक प्रसिद्धीसाठी किंवा केवळ अज्ञानापोटी किती थराला जाऊ शकतात, याची उदाहरणे वेळोवेळी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्काही बसेल आणि हसूही येईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेल्या 'इमर्जन्सी विंडो'चा असा काही विचित्र वापर या व्हिडिओत दिसतोय, ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक रेल्वे (Train) गाडी प्लॅटफॉर्मवर उभी असल्याचे दिसते. रेल्वेच्या एका डब्यातील इमर्जन्सी विंडोमधून एक तरुण अर्धा बाहेर लटकलेला दिसत आहे. त्याचा एक पाय खिडकीवर आहे, तर दुसरा पाय त्याने खिडकीच्या बाजूला असलेल्या रेल्वेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपवर ठेवला आहे. इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने एका लहान मुलाला आपल्या हातांनी पकडून त्याच पाईपवर उभे केले आहे. तो मुलगा तिथे उभा राहून प्लॅटफॉर्मच्या बाजूला लघवी करताना दिसत आहे.
हा सर्व प्रकार केवळ अस्वच्छतेचा नसून अत्यंत जीवघेणा आहे. रेल्वे कधीही सुरु होऊ शकते, याची जाणीव त्या व्यक्तीला नसल्याचे दिसते. जर त्याच क्षणी रेल्वे सुरु झाली असती आणि तो तरुण वेळेत आत जाऊ शकला नसता, तर तो आणि तो लहान मुलगा दोघेही रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत कोसळले असते. रेल्वेच्या नियमांनुसार इमर्जन्सी विंडो ही केवळ आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी असते, अशा प्रकारे 'विंडो सीट'चा वापर करणे हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण जीवावर बेतणाराही आहे.
हा व्हिडिओ 'एक्स' वर @BhanuNand नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, "या भारत देशात अनेक अखंड मूर्ख लोक आहेत, म्हणूनच हा देश विकसित होऊ शकत नाहीये. आता या मूर्खाला पाहा, तो स्वतःचा आणि मुलाचा जीव कसा धोक्यात घालत आहे." हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले, "याची बुद्धी घास चरायला गेली आहे का?" तर दुसऱ्या एका युजरने उपरोधिकपणे म्हटले की, "आमच्या देशात अशा नमुन्यांची अजिबात कमतरता नाही, हेच लोक रेल्वे प्रशासनाला दोष देतात जेव्हा अपघात होतो."
भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांच्या (Passengers) सुरक्षेसाठी कडक नियम आहेत. चालत्या किंवा उभ्या असलेल्या रेल्वेच्या खिडकीतून बाहेर लटकणे किंवा रेल्वे मालमत्तेचा असा चुकीचा वापर करणे दंडनीय अपराध आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे केवळ स्वतःचाच नाही, तर रेल्वेच्या कामकाजातही अडथळा निर्माण होतो. या व्हिडिओमुळे आता पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.