Free Water Supply: Entrepreneurs criticize Goa government Dainik Gomantak
गोवा

उद्योजकांकडून गोवा सरकारवर टीका

घरांना मोफत; तर उद्योगासाठी महागडे पाणी

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकारने (Goa Government) एका बाजूने घरगुती वापरासाठी 16 हजार लिटर पाणी फुकट देण्याची (Free Water Supply) घोषणा केली खरी, परंतु दुसऱ्या बाजूने औद्योगिक वापरासाठीच्या (Industrial Use) कच्च्‍या पाण्याचे (Water) दर भरमसाट वाढवले आहेत.

औद्योगिक वापरासाठी 39 रुपये प्रति हजार लिटर असा सरकारचा पाणी पुरवठ्याचा दर होता. तो आता 78 रुपये प्रति हजार लिटर असा करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्र व्यवस्थापकांनी परिपत्रक काढून कंपन्यांना दरवाढीची माहिती दिली आहे. 1एप्रिल 2021 या पूर्वलक्षी प्रभावाने ही दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे एप्रिल ते ऑगस्टपर्यंतचा दराचा फरक औद्योगिक आस्थापनांना आता फेडावा लागणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोफत पाणी मिळवण्यासाठी ‘पाणी वाचवा’ असे आवाहन मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करताना केले होते. आता या सरकारी पावलामुळे मते मिळवण्यासाठी मोफत पाणी असे सरकारी धोरण दिसते अशा प्रतिक्रिया उद्योगजगतातून ऐकायला मिळत आहेत.

राज्य सकल उत्पादनात महत्त्वाचा वाटा उचलणारे उद्योग क्षेत्र गेले 18 महिने अस्तित्व कायम ठेवण्यासाठी झुंजत आहे. कोविड कठीण काळात सरकारने मदतीचा हात देण्यासाठी उपाययोजना आखावी यासाठी उद्योजकांनी सरकारला वारंवार विनंती केली. मात्र सरकारला उद्योग क्षेत्रापेक्षा मतांचीच जास्त चिंता आहे, अशी टीका आता उद्योग क्षेत्रातून होऊ लागली आहे.

"सरकारने औद्योगिक पाणीपट्टीत वाढ केल्याने उद्योगांना टॅंकरमधील पाणी विकत घ्यावे लागणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर भूजल उपसा होईल आणि त्याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे."

- दामोदर कोचकर, गोवा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT