CMs gift to goan women Free 3 LPG cylinders per year Dainik Gomantak
गोवा

Free LPG Cylinder in Goa : आता गोव्यात मिळणार तीन सिलिंडर मोफत; कुणाला मिळणार फायदा? जाणून घ्या एका क्लिकवर

गोवा सरकारने या योजनेसह काही निकषही जाहीर केले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या गोमंतकीयांनाच मोफत तीन सिलिंडर मिळणार आहेत.

आदित्य जोशी

Free LPG Cylinder in Goa : गोव्यातील विधानसभा निवडणुकीआधी भाजपने तीन मोफत सिंलिंडर देण्याचं आश्वासन मतदारांना दिलं होतं. सत्तेत आल्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा गोवा सरकारने केली आहे. मात्र सरसरट सर्वांनाच या योजनेचा फायदा मिळणार नाही. गोवा सरकारने या योजनेसह काही निकषही जाहीर केले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या गोमंतकीयांनाच मोफत तीन सिलिंडर मिळणार आहेत.

गोवा सरकारने केवळ दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच या योजनेचा फायदा मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. याआधी ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे यांनी रेशनकार्ड धारक आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल अशा सर्वांना 3 मोफत सिलिंडर मिळणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार केवळ दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच याचा लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

सत्तेत येऊन 9 महिने होत आले तरी अद्याप जाहीर केलेली योजना कार्यान्वित करणं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना काही शक्य झालेलं नाही. अर्थ खात्याने अजूनही या योजनेला मंजुरी दिलेली नाही. मात्र सध्या केवळ दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना या योजनेचा लाभ देत ती कार्यान्वित करण्याचं सूतोवाच मंत्री गोविंद गावडेंनी केलं आहे. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 32 कोटींचा भार पडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जर आर्थिक निकषावर ही योजना राबवायची असेल तर त्यासाठी सुमारे 60 कोटींहून अधिकचा निधी अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या ही योजना मर्यादित स्वरुपात राबवत असल्याचं गावडेंचं म्हणणं आहे. आपण या योजनेची फाईल ही अर्थ खात्याकडे पाठवली असून ती मंजूर झाल्यावर कॅबिनेटसमोर ठेवण्यात येईल असंही ते म्हणाले.

जर ही योजना कोणत्याही निकषांविना सर्व गोमंतकीयांसाठी राबवायची झाल्यास त्यासाठी सरकारी तिजोरीवर तब्बल 132 कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं गोविंद गावडेंचं म्हणणं आहे. दरम्यान भाजपच्या जाहीरनाम्यात सरकार तीन वर्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काणतीही वाढ करणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच गोवेकरांना चांगल्या घरांसाठी पुढील पाच वर्षं महिलांना 2 टक्के आणि पुरुषांना 4 टक्के इतक्या नाममात्र व्याजावर गरजूंना गृहकर्ज देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT