Women health checkup scheme goa Dainik Gomantak
गोवा

Check By Doctor: महत्वाची बातमी! 40 वर्षांवरील महिलांसाठी ‘चेक बाय दोतोर’! 31 मार्चपर्यंत सर्व सरकारी केंद्रांवर सुविधा उपलब्ध

Women health checkup scheme goa: विशेष म्हणजे, खासगी इस्‍पितळांतही सवलतीच्‍या दरात ही सुविधा देण्‍यात येणार असल्‍याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जागतिक महिला दिनाचे औचित्‍य साधून राज्‍य सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्वच सरकारी इस्‍पितळांत ४० वर्षांवरील महिलांच्‍या आरोग्‍याची मोफत तपासणी करण्‍यासाठी ‘चेक बाय दोतोर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

विशेष म्हणजे, खासगी इस्‍पितळांतही सवलतीच्‍या दरात ही सुविधा देण्‍यात येणार असल्‍याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘चेक बाय दोतोर’ या उपक्रमात सहभागी होऊन ४० वर्षांवरील महिलांनी आरोग्‍याची मोफत तपासणी करून घ्‍यावी, असे आवाहन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी राज्‍यभरातील महिलांसाठी सरकार विविध उपक्रमांचे आयोजन करते. यंदा या दिनाचे औचित्‍य साधून ४० वर्षांवरील महिलांनी आरोग्‍याची तपासणी करून घ्‍यावी, यासाठी ‘चेक बाय दोतोर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गृहिणी कुटुंबातील सर्वांची काळजी घेतात. आता गृहिणींची काळजी घेण्‍यासाठी हा उपक्रम राबविण्‍यात आला अाहे.

वेळेत आजाराच्या निदानासाठी उपक्रम

गेल्या काही वर्षांत राज्यात महिलांमध्ये स्तन कर्करोग आणि ॲनेमियाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अनेक महिला वेळेवर आरोग्य तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येऊ शकणारे आजार पुढे गंभीर स्वरूप धारण करतात. परिणामी, शेवटच्या टप्प्यात उपचार करणे अधिक कठीण होते. ही बाब लक्षात घेऊन सरकारतर्फे ‘चेक बाय दोतोर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे महिलांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

प्रत्‍येक तालुक्‍यातील एका खासगी इस्‍पितळात सुविधा

खासगी इस्‍पितळांमध्‍ये विविध प्रकारच्‍या चाचण्‍या करण्‍यासाठी हजारो रुपये खर्च येतो. त्‍यामुळे सरकारने या उपक्रमांतर्गत मणिपालसह प्रत्‍येक तालुक्‍यातील एका खासगी इस्‍पितळात सवलतीच्‍या दरात ही सुविधा देण्‍याचे निश्‍चित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जमीन वाचवा, गोवा वाचवा! पर्यावरणासाठी 'इनफ इज इनफ'चा एल्गार; राष्ट्रपतींच्या सूचनेनंतरही राज्य सरकार गप्प का? कुएल्हो यांचा सवाल

Iran Shopping Center Fire: इराणमध्ये शॉपिंग सेंटरला भीषण आग! 8 जणांचा होरपळून मृत्यू, 36 जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

'लुईस बर्जर'शी माझा संबंध नाही! चर्चिल आलेमाव यांचा पर्रीकरांवर खळबळजनक आरोप; ईडीची केस रद्द झाल्यावर दिली प्रतिक्रिया

Goa Parasailing Accident Video: गळ्याभोवती दोरी आवळली, श्वास कोंडला, मृत्यू समोर दिसला! गोव्यातील पॅरासेलिंगचा जीवघेणा थरार व्हायरल; महिलेनं सांगितली आपबिती

Fatorda Illegal Casinos: फाताेर्ड्यातील कॅसिनोंना सत्ताधाऱ्यांचं 'अभय'! आमदार सरदेसाईंचा घणाघात; कायदा-सुव्यवस्था धोक्यात

SCROLL FOR NEXT