Free Bus Service For IFFI Delegates Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2024: इफ्फी प्रतिनिधींसाठी खास इलेक्ट्रीक बससेवा, रिक्षाचीही मोफत सोय; जाणून घ्या रुट

Free Bus Service For IFFI Delegates: इफ्फी प्रतिनिधींसाठी तो मोफत असेल. ‘इफ्फी’ असे लिहिलेल्या व सजावट असलेल्या कदंबच्या इलेक्‍ट्रिक बसेस सेवा देतील.

गोमन्तक डिजिटल टीम

गंगाराम आवणे

राजधानी पणजीत (Panaji) इफ्‍फीची लगबग सुरू झाली आहे. या महोत्‍सवाचा प्रतिनिधींना आनंद घेता यावा, महोत्सवात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, वेळेत कार्यक्रमाच्या ठिकाणी जाता यावे यासाठी तीन मार्गांवर मोफत बससेवा सुरू करण्यात आली असून ती सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. तर काही स्थळांवरून प्रतिनिधींना येता, जाता यावे यासाठी रिक्षा देखील असतील.

पणजीत इफ्फीला येणाऱ्यांच्‍या वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीवर ताण येऊ नये तसेच वाहतूक कोंडीवर नियंत्रण यावे म्‍हणून ही बससेवा सुरू करण्‍यात आली आहे. इफ्फी प्रतिनिधींसाठी तो मोफत असेल. ‘इफ्फी’ असे लिहिलेल्या व सजावट असलेल्या कदंबच्या इलेक्‍ट्रिक बसेस सेवा देतील. फोंडा (Ponda) आणि मडगावहून देखील प्रतिनिधींना सहभागी होण्यासाठी किंवा तेथील कार्यक्रमांत सहभागी होण्याकरिता प्रतिनिधींना या बससेवेचा लाभ घेता येणार आहे.

मोफत बससेवेचे मार्ग

मार्ग क्र. १ : मिरामार सर्कल-मेरियॉट हॉटेल बसथांबा-कांपाल ग्राऊंड-कला अकादमी-आयनॉक्स, जुने गोमॅको इमारत-पणजी मार्केट-सांता मोनिका जेटी-आयनॉक्स पर्वरी.

मार्ग क्र. २ : आयनॉक्स पर्वरी, मल्‍टिलेवल पार्किंग-पणजी मार्केट-कांपाल-कला अकादमी-साग ग्राऊंड-मेरियॉट बसथांबा-मिरामार सर्कल

मार्ग क्र. ३ : मिरामार सर्कल-मेरियॉट बसस्थानक-कांपाल ग्राऊंड-कला अकादमी-आयनॉक्स-जुने गोमेकॉ इमारत-पणजी मार्केट-सांता मोनिका जेटी-आयनॉक्स मडगाव-मॅजिक मूव्हीज फोंडा आणि परत.

साहित्य ठेवण्यासाठी विशिष्ट जागा

इफ्फीत येणाऱ्या प्रतिनिधींच्‍या बॅग्स व इतर साहित्य ठेवायचे असल्यास त्यासाठी गोवा मनोरंजन सोसायटीच्या आवारात विशेष जागा ठेवण्‍यात आली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्‍य’ या तत्त्वावर जागा उपलब्‍ध करून दिली जाईल. मात्र या साहित्यामध्‍ये आपल्या मौल्यवान वस्तू ठेवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ही सुविधा सकाळी ८.३० वाजल्‍यापासून सायंकाळी शेवटच्‍या प्रयोगानंतर ३० मिनिटापर्यंत उपलब्ध असेल, असे गोवा मनोरंजन संस्थेने म्हटले आहे.

या वस्तूंवर असेल बंदी

१) कोणत्याही प्रकारचे शस्त्र, अवजार

२) पाण्याची बाटली

३) अन्नपदार्थ

४) कॅमेरा

५) टेप-व्हिडिओ रिकॉर्डर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT