पणजी: गोव्यात ५५व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यंदा सरकारने इफ्फीसाठी एकूण २८ कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती मिळते. एकूणच शिग्मा आणि कार्निवल यांचा परेड किंवा ठिकठिकाणी होणाऱ्या चित्रपटांच्या स्क्रीनिंगमुळे चित्रपट प्रेमींमध्ये इफ्फी बद्दलचे कुतूहल आणखीनच वाढले आहे. यंदाच्या वर्षी इफ्फीमध्ये दोन थिएटरमध्ये सहा अतिरिक्त स्क्रीनद्वारे चित्रपटांचे स्क्रीनग केले जाईल आणि या दोन थिएटर्समध्ये मडगाव आणि फोंड्याच्या थिएटर्सचा समावेश होतो.
दोन्ही थिएटर्सपैकी चार स्क्रीन्स आयनॉक्स मडगाव येथे लागतील तर राहिलेल्या दोन स्क्रीन्स आयनॉक्स फोंडा येथे लावल्या जाणार आहेत. एकूणच आयनॉक्स पणजी, मॅक्विनेझ पॅलेस, आयनॉक्स पर्वरी, आयनॉक्स मडगाव आणि आयनॉक्स फोंडा अशा पाच ठिकाणी 270 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील.
याव्यतिरिक्त इफ्फीच्या निमित्ताने गोव्यात पाच आउटडोअर सिनेमा थिएटर्स उभारले जातील, यामुळे चित्रपटप्रेमींना चित्रपटांचा आणखीन चांगला अनुभव घेण्याची संधी मिळेल.
अवघ्या काही दिवसांवर हा चित्रपट महोत्सव येऊन ठेपला असून राजधानी पणजीत इफ्फीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यासह महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची नावे तसेच, महोत्सवात हजेरी लावणारे कलाकार, मान्यवर यांची नावे समोर येऊ लागली आहेत. शिवाय यावेळी वर्ल्ड प्रीमियर आणि आशिया प्रीमियरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची नावे आणि वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.